नागपुरात ‘सास्कृंतिक महोत्सावा’चे तीन तेरा; पासधारक प्रेक्षकांना प्रवेश नाकारला
पास वाटपाची खैरात, नियोजनाचा अभाव
नागपुरात ‘सास्कृंतिक महोत्सावा’चे तीन तेरा; पासधारक प्रेक्षकांना प्रवेश नाकारला
पास वाटपाची खैरात, नियोजनाचा अभाव
गरजेपेक्षा प्रवेशिका वाटप केल्याने नागपुरकरांची गैरसोय
नागपूर: राज्याच्या उपराजधानीत मानाचा खासदार सांस्कृतिक महोत्सव नुकताच सुरू झाला असून दरवर्षी प्रमाणे यंदाही नागपूरकरांचा उत्साह कायम असतांना नितीन गडकरी खासदार महोत्सवाचे तीन तेरा वाजल्याचे आज दि २१ रोजी क्रीडा चौक येथे आयोजित केलेल्या सांस्कृतिक महोत्सवात दिसून आले.
नागपुरात प्रशासनाचे दुर्लक्ष हा तर कायमचा विषय असला तरी हौसी व दर्दी प्रेक्षकांना आज पासेस असूनही दोन तासापासून प्रवेशद्वारावर कुटुंबासह आत जाण्याची वाट बघावी लागली. कारण आज गरजेपेक्षा पास वाटपाची खैरात जास्त झाल्याचे दिसून आले. ज्या पक्षाच्या उमेदवारास आपण निवडून दिले, त्यांनी तरी नागरिकांना होय असलेल्या गैरसोयीबाबत नियोजन करणे गरजेचे होते असा सूर आज दक्षिण नागपुरातील प्रेक्षकांनी प्रस्तूत प्रतिनिधीस सांगितले.
खासदार सांस्कृतिक महोत्वासासाठी आजच्या दिवशी निवडक पास वाटप केले असते तर अशी नामुष्की उद्भवली नसती आणि आमच्या कुटुंबासह आम्हास परत जाण्याची नामुष्की आली नसती असे गडकरी समर्थक केदार बंधू यांनी सांगितले. महोत्सवास गालबोट लागू नये याची चिंता नागपूरकरांना आहे. पण पोलीस प्रशासन लाठीमार करून पास धारकांनाही मारहाण करताहेत हे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. जर नियोजन करता येत नसेल तर असे कार्यक्रम घेऊ नका. अन्यथा ज्येष्ठ नागरीक संघटना यापुढे आंदोलन करणार असल्याचे दक्षिण नागपूर येथील ज्येष्ठ नागरिक मंच च्या प्रतिनिधीने सांगितले.