Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहात साजरा

तुषार थळे,प्रतिनिधी

0 1 8 2 2 8

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहात साजरा

तुषार थळे,प्रतिनिधी

अलिबाग: (दि.२१ डिसेंबर): आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

विद्यार्थी दिनाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आशिष राणे सर कैलास शिकारे सर, दत्तात्रय आहिरे सर व सचिन भंडारे सर यांनी आतिशय सुंदर असे नियोजन केले. इ. १० वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांनी इ. ५ वी ते इ. ९ वी च्या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचे काम केले. तसेच त्यांनी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, विषय शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपीक, ग्रंथपाल, शिपाई इत्यादी भूमिका अगदी योग्य रीतीने साकारल्या.

वर्ग अध्यापनानंतर संस्थेच्या स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे सभागृहात जेष्ठ शिक्षक कैलास शिकारे सर यांच्या अध्यक्षतेखाली समारोपाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी सर्व प्रथम विद्यार्थी शिक्षकांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास शिकारे सर, सर्व शिक्षक-शिक्षिका यांचा यथोचित सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रास्तविक व मनोगत विद्यांर्थीनी मुख्याध्यापिका अपूर्वा म्हात्रे [ इ.१२ वाणिज्य ], सुत्रसंचलन व मनोगत विद्यार्थीनी उपमुख्याध्यापिका सृष्टी भगत [ इ.१२ वी वाणिज्य ] हिने तर आभार प्रदर्शन विद्यार्थीनी शिक्षिका अंकिता लांडगे [ इ.१२ वी वाणिज्य ] हिने केले.

याप्रसंगी विद्यार्थी पर्यवेक्षक राज म्हात्रे [ इ. १० वी अ ], विद्यार्थीनी शिक्षिका श्रेया म्हात्रे [ इ. १० वी अ ], कार्तिकी पूरो [ १० वी अ ], सेजल जोगी [ इ. १२ वी कला ], यांनी आपल्या मनोगतातून त्यांना शिक्षक म्हणून आलेले अनुभव कथन केले आणि आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, कैलास शिकारे सर, दत्तात्रय अहिरे सर, आशिष राणे सर, सांस्कृतिक समिती प्रमुख अजित नाईक सर, सचिन भंडारे सर, नितिन शिंदे सर व प्रियंका राणे मॕडम, यांनी आपल्या मनोगतातून बहुमोल असे मार्गदर्शन केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी दिन यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी बहुमोल सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 2 2 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे