Breaking
कविताक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरछत्रपती संभाजीनगरनागपूरपरीक्षण लेखमराठवाडासाहित्यगंध

‘मराठीचे शिलेदार समूहाप्रती ‘आभारीय शब्दसुमने’; वर्षा मोटे पंडित

वर्षा मोटे पंडित जि. छत्रपती संभाजी नगर

0 5 2 2 5 6

‘मराठीचे शिलेदार समूहाप्रती ‘आभारीय शब्दसुमने’; वर्षा मोटे पंडित

आभारांचे वंदन व्हावे
साहित्यात मुक्त मनाने,
समूहाचे दान पुन्हा फुलो
समूहाच्याच सानिध्याने..”

दिनांक 28 मार्च शनिवारी मी सर्व समूहामध्ये विषय बघितले आणि पटापट लिखाणास सुरुवात केली. दुपारपर्यंत समूहातील हायकू, त्रिवेणी, चारोळी, रचना आणि बालकाव्य या सर्वांचे लेखन मी केले. परंतु त्यादिवशी समूह मला जरा शांत शांतच वाटला, का झाले असेल असं? मनात विचारही आला. कारण त्या दिवशी कोणाचेही सर्वोत्कृष्ट पोस्टर जाहीर झालेले नव्हते. मनाला जरा हुरहुर वाटली परंतु पुन्हा असा विचार केला की सर्वच आपापल्या कामात व्यस्त असतील.

कारण सगळ्याच्या मागे पडत आपल्या कामाचा व्याप आहे. तरीही एवढ्या व्यस्ततेतून आपल्यासाठी लाख मोलाचा वेळ देत आहेत. दुसऱ्या दिवशी रविवार सुट्टीचा दिवस आणि आनंदाचा आणि आवडीचा देखील कारण या दिवशी आम्ही बायका नेहमीच्या वेळेपेक्षा अर्धा ते एक घंटा झोपेतून उशिरा उठतो. म्हणजे आठवड्यातील रविवार हा आपला हक्काचा आरामाचा दिवस आहे असं वाटतं अगदी शनिवारीच आम्ही झोपताना आपल्या मेंदूला तशी चेतना देऊनच झोपतो. आजही मी प्रत्येक रविवार सारखं थोडेसे उशिरा झोपेतून उठले आणि हातात मोबाईल घेतला. त्याच वेळेस दादांचा जादुई संदेश ‘तुमचा फोटो पाठवा’ मला दिसला क्षणाचाही विलंब न करता मी लगेच फोटो दादांना सेंड केला.

एवढी प्रसन्न सकाळ झाली आज परंतु नेमके कोणत्या समूहामध्ये आज आपण सर्व उत्कृष्ट लेखन केले असेल याची उत्सुकता शांत बसू देत नव्हती. तशीच पुढच्या कामाला लागली आणि तासाभराने मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ या समूहात सर्व उत्कृष्ट पोस्टर झळकले. सांगायचं म्हणजे या समूहात मी आत्ताच कुठे लिहायला लागले आहे. मी तिकडे लेखन करतच नाही, कारण बालकाव्य मला खूप अवघड वाटते. परंतु सर्वोत्कृष्ट चे पोस्टर पाहून मनाला अतिशय आनंद झाला आणि त्या दिवशीचा विषय होता ‘खोटारडेपणा’ यावरच मी काव्य लिहिले.

या भावनेला हृदयाशी धरून, आज मी कृतज्ञतेचे काही शब्द व्यक्त करीत आहे. काही क्षण असे असतात जेव्हा शब्द अपुरे पडतात… कारण मनातली भावना इतकी गहिर्‍या स्वरूपाची असते की ती व्यक्त करताना शब्दांची मर्यादा जाणवते. आजचा हा क्षण तसाच आहे. या सुंदर सोहळ्यामागे उभी असलेली शक्ती म्हणजे आपला ‘मराठीचे शिलेदार समूह’ ज्यांनी निस्सीम प्रेमाने आणि समर्पणाने मराठीची सेवा आजवर केली आणि पुढेही निरंतर करत राहील.

हा समूह केवळ काही व्यक्तींचा संच नाही, तर तो एक जिव्हाळ्याचा धागा आहे, जो प्रत्येकाला एकमेकांशी जोडतो. येथे प्रत्येकजण आपल्या परीने काहीतरी देत असतो वेळ, श्रम, विचार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनापासूनची साथ. या देण्यात कोणताही दिखावा नाही, अपेक्षा नाही… आहे ती फक्त निखळ भावना आणि मराठी बद्दलचा अभिमान. म्हणूनच या समूहातील प्रत्येक शिलेदार हा जणू एक दीप आहे, जो स्वतः जळून इतरांच्या वाटा उजळवत राहतो. मी केलेले बालकाव्य आदर्श परीक्षकांना भावले याचा मला खरंच मनस्वी आनंद आहे.

‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा मुख्य संपादक आ. राहुल दादा, आ.सचिव पल्लवीताई , मुख्य परीक्षक आ. सविताताई, आ, स्वातीताई, आ. वृंदाताई, आ. शर्मिलाताई, आ. तारका ताई, आ. विष्णू दादा, आ. प्रशांत दादा, आ. संग्राम दादा, आ. उरकुडे दादा आणि समस्त प्रशासक समिती आपल्या सर्वांचे मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर समूहातील माझे सर्व मराठीचे शिलेदार ताई आणि दादांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि सर्वांच्या लेखणीस खूप खूप शुभेच्छा. शेवटी एवढेच मनापासून सांगावेसे वाटते आभार हे फक्त शब्दांत व्यक्त होऊन थांबू नयेत, तर ते आपल्या नात्यांत, कृतीत आणि आठवणींतून कायम जिवंत राहावेत. “आभारांचे वंदन व्हावे मुक्त मनाने, समूहाचे दान पुन्हा फुलो समूहाच्याच सानिध्याने…” याच भावनेने, पुन्हा एकदा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!

वर्षा मोटे पंडित
जि. छत्रपती संभाजी नगर
सदस्या, मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 2 5 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे