Breaking
ई-पेपरकविताबीडमराठवाडासाहित्यगंध

अख्या महाराष्ट्रात देखणा

राजश्री मिसाळ ढाकणे जिल्हा बीड

0 4 8 2 9 0

अख्या महाराष्ट्रात देखणा

वैभवशाली भूमी आहे
माझ्या बीड जिल्ह्याची
अकरा तालुक्यात प्रसिद्ध
स्थळे आहेत पर्यटनाची…!!

भगवान शिवांना अर्पण
येथे मंदिर कंकालेश्वराचे
पर्यटकांचे खास आकर्षण
कपिलधारच्या धबधब्याचे…!!

राष्ट्रसंत वामनभाऊ आणि
भगवान बाबांचा पदस्पर्श
गौरवशाली येथील वारसा
सांगताना मनी होतो हर्ष…!!

भगवान शनिदेव प्रसिद्ध
गोदावरी तीरावर गेवराई
आद्यकवी मुकुंदराज जन्म
आणि देवीची अंबाजोगाई…!!

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक
आहे वैद्यनाथ मंदिर परळीला
बालाघाटच्या डोंगर रांगेत
कलाकारांचा वारसा लाभला..!!

मुंडे साहेबांचा बीड जिल्हा
वैभवशाली शौर्याची परंपरा
अख्या महाराष्ट्रात देखणा
निसर्गरम्य परिसर सारा…!!

राजश्री मिसाळ ढाकणे
जिल्हा बीड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे