Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

परतफेड

सविता धमगाये ता. जि.नागपूर

0 5 1 6 5 1

परतफेड

इवलासा जीव तो
भूईखाली दबला
श्वास गुदमरला
तरारून उठला

इवलेसे कोवळेसे
नाजूकसे जोडपान
मिट मिट नयनांनी
घेई जगाचे ज्ञान

वारा हळूच आला
कुरवाळून गेला
अवखळ चंचल
टिचकी मारून गेला

पावसाच्या सरींनी
चिंब चिंब भिजवले
नाऊ माखू घालून
छान छान श्रृंगारले

हळू हळू पानांचा
गोतावळा वाढला
सुगंधीत फुलांनी
तरू बहरू लागला

फुलातून फळांनी
हळूच जीव धरला
रसदार पक्व होऊन
रस गळू लागला

लगोलग प्राण्यांची
नजर टवकारली
फळगर खाण्यासाठी
भरारून आली

फळे खा मनभरून
विसरू नका धरेला
परतफेड निसर्गाला
रान परत बहरायला

सविता धमगाये
ता. जि.नागपूर
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे