0
4
8
2
9
0
क्षणोक्षणी
नाम घ्यावे सदा ईश्वराचे
अडचणी दूर पळेल
आलेल्या वादळापासून
संकट सारे टळेल
भक्ती करावीत नित्य नेमाने
दृढ विश्वास मनात ठेवून
वाईट परिस्थितीत हरि
क्षणोक्षणी येईल धाऊन
मार्गात कितीही अडथळे
दुःखाचे डोंगर आले असेल
निमूटपणे नामस्मरण
दुःखाचे निवारण होईल
क्षणोक्षणी देवाची धावा
आत्मिक समाधान
मन प्रसन्न चित्ती
ह्रदयी देव वसती
पुष्पा डोनीवार,चंद्रपूर
=============
0
4
8
2
9
0



