ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरनांदेडमराठवाडासाहित्यगंध
दुरावा
गोधने प्रकाश पुंडलिकराव
0
4
8
2
9
0
दुरावा
वाटेना आता कुणाची हुरहुर
कानी पडेना ओळखीचा सूर
वाट वाकडी नजरेअड करून
नकळत मानसे चालली दूर दूर
कधी कधी कंठासह दाटून येतो उर
मनी आठवणींचे उठते काहूर
आपल्याच माणसाचे चेहरे
का आता भासू लागले भेसूर
नवे पंख फुटताच पाखरांना
पाखरे उडून जातात दूर दूर
वर्तमानाने कुस बदलली की
आईपासून लेकरे जातात दूर
बदलले हवामान इथले
निसर्गही झाला मजबूर
मोसमी पाऊसही बदलला
पावसासह कधीही येतो पूर
ममता उरलीच नाही आता
बाळ स्तनपानासाठी अतूर
फिगर फुलवण्याच्या फंद्यात
आई बाळापासून चालली दूर
गोधने प्रकाश पुंडलिकराव
बाचोटी ता.कंधार जि.नांदेड
==========
0
4
8
2
9
0



