
0
4
8
2
9
7
प्रेमाचं ऑडीट
मनातही नसतांना भेटतं
अनोळखी अनाहूत कुणी
हळूच आयुष्यात मग
येत प्रेम चोर पावलांनी
मौन असुनही तो वेडा
नजरेने बोलून जाते
क्षणात स्पंदनात रुजते
नकळत सारे घडते
सुख स्पर्शाने त्याच्या
मन पाखरू बणते
नाद त्याचा वेड्यापरी
मग एकांतातच हसते
सख्याच्या परीस स्पर्शाने
उठले हृदयी प्रित तराने
मन माझे मोहित होते
त्याच्या निखळ प्रेमाने
नाना चौकशा प्रेमाच ऑडीट
उचके धंदे या समाजाला
हातात हात धरले आम्ही घट्ट
घाबरणार नाही आता जगाला
प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर
=========
0
4
8
2
9
7



