
0
6
3
9
6
2
दिपावली
लावू अंगणी दिपज्योती
प्रकाश फुलवी ती पणती
चैतन्य फुले चौफेर
हर्ष मनासी साकार
दारी रोषणाई झळके
प्रकाश सोनेरी चमके
जीवन असे हे सुंदर
फुले प्रसन्न बहर
उजळू दे आकाश दिव्यांनी
प्रकाश फुलू दे अंतर्मनी
द्वेष ,मत्सर देवू जाळूनी
घेऊ बंध नात्याचे जोडुनी
दिव्यांनी उजळू दे आसमंत
काळोख पळेल क्षणात
द्रृष्टीत नवतेज भरू
स्रृष्टीत चैतन्य फुलवू
फटाके उडवू अंगणी
आतिषबाजी करू गगणी
करू लक्ष्मीचे पुजन
मन होईल प्रसन्न
पुरुषोत्तम वि.ठोंबरे
झिंगाबाई टाकळी, नागपूर
0
6
3
9
6
2



