
0
4
0
8
9
0
पहिलं प्रेम
पहिलं प्रेम कधीच
विसरता येत नाही
क्षण ते बेधुंद सोनेरी
मनातून जात नाही
ती मिठी तो सहवास
दरवळ तो प्रीतीचा
फार हळव नि नाजुक
जणू मधुगंध फुलांचा
तो किनारा ती लाट
ठाव घेतोय मनाचा
ती डायरी तो छंद
जडतो लिखाणाचा
पहिलं प्रेम खरं प्रेम
भासते जग हे भन्नाट
प्रेमळ सख्यासाठी वाटे
सुखकर काटेरीही वाट
प्रेमाचा प्रत्येक किरण
नित्य तेजोमय भासतो
चाॅंदवा जणू माझा सखा
जीवनी माझ्या प्रकाश देतो
प्रतिमा नंदेश्वर
ता. मूल जि.चंद्रपूर
====
0
4
0
8
9
0





