
0
4
0
9
0
3
ठिगणी
विषमतेच्या राखेआड
धगधगणारी ठिणगी
बेईमानीच्या फुत्काराने
जेव्हा उघडी पडते…
पेटतो असा वणवा
समाज मनामनात की
सर्व बेचिराख होते…
माणसाची माणुसकी
संपलेल्या युगात
पर्वा कुणाला?…
जो तो आपली पोळी
भाजण्याच्या प्रयत्नात
सर्वधर्मसमभावाची लक्तरे
वेशीवर टांगतांना
बेफिकीरीच्या नशेत गुंग
भविष्याची चिंता न करता…
कारण आम्ही
इतिहास फक्त वाचलाय
मनात उतरलाच नाही
ठेच लागूनही
समाज सुधारला नाही…
पुन्हा त्याच खड्याकडे
आमची पाऊल वळालेली
लगाम लावला नाहीतर
लवकरच दिसेल आम्हास
इतिहासाची पाने अश्रूंनी
पुन्हा एकदा डबडबलेली….
श्री अरविंद उरकुडे
जि.गडचिरोली
=========
0
4
0
9
0
3





