ठाणे येथील योध्दा रेस स्पर्धेत F80 Fitness Studio च्या खेळाडूंचे वर्चस्व
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
ठाणे येथील योध्दा रेस स्पर्धेत F80 Fitness Studio च्या खेळाडूंचे वर्चस्व
उल्लेखनीय कामगिरी करत वेगळी ओळख निर्माण
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
ठाणे : (दि २०) ठाणे येथे झालेल्या योध्दा रेस स्पर्धेत F80 Fitness Studio च्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली.
🔹 स्पर्धक व वेळा :
• स्वप्निल पालकर – 1 तास 11 मिनिटे
• अभिजीत कर्भारी – 1 तास 11 मिनिटे
• अंकुश ठाकूर – 1 तास 24 मिनिटे
• सागर शिंदे – 1 तास 09 मिनिटे
• अमित पालकर – 1 तास 22 मिनिटे
• प्रणव पाटील – 1 तास 39 मिनिटे
• निकिता पालकर – 1 तास 23 मिनिटे
• भूमिका पाटील – 1 तास 30 मिनिटे
• मझिन पटेल – 1 तास 30 मिनिटे
• मानिषा मेश्राम व धनश्री घोरडडेकर (महिला डबल्स) – 1 तास 10 मिनिटे
या यशामागे मुख्य प्रशिक्षक अद्वैत पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. गेल्या ४–५ महिन्यांपासून त्यांनी प्रत्येक स्पर्धकासाठी नियोजित प्रशिक्षण, ताकद, सहनशक्ती व मोबिलिटीवर भर देत शिस्तबद्ध तयारी करून घेतली. कामाचा ताण, थकवा व वेदना लक्षात घेऊन प्रशिक्षणात वेळोवेळी बदल करत खेळाडूंना मानसिक व शारीरिकदृष्ट्या स्पर्धेसाठी सज्ज केले.
या कामगिरीतून स्पष्ट होते की अशा स्पर्धांसाठी अॅथलेटिक्सची पार्श्वभूमी असणे आवश्यक नाही. कठोर मेहनत, सातत्य, शिस्त आणि योग्य मार्गदर्शन असल्यास कोणतीही व्यक्ती अशा आव्हानांवर मात करू शकते. ही कामगिरी सर्व सदस्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. फिट रहा, सातत्य ठेवा आणि येणाऱ्या योध्दा रेस व HYROX स्पर्धांमध्ये नक्की सहभागी व्हा.



