Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूर

शिवसेना (शिंदे गट) सामाजिक कार्यकर्ते मुंदाफळे यांच्यातर्फे अन्न पुरवठा विभागाला निवेदन सादर

नागपूर शहर प्रतिनिधी

0 5 3 6 2 5

शिवसेना (शिंदे गट) सामाजिक कार्यकर्ते मुंदाफळे यांच्यातर्फे अन्न पुरवठा विभागाला निवेदन सादर

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज मिडीया

नागपूर : (दि १०) शिवसेना (शिंदे गट) तर्फे गरीब व होतकरू गरजू नागरिकांना वेळेवर व नियमितपणे राशन मिळावे या प्रमुख मागणीसाठी १० एप्रील रोजी अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल व आमदार कृपाल तुमान, तसेच नागपूर जिल्हा अध्यक्ष सुरज गोजे व नागपूर शहर अध्यक्ष समीर शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार देण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रेम (हितेश) मुंदाफळे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी अन्न पुरवठा विभागात जाऊन प्रत्यक्षपणे प्रशासनाचे लक्ष वेधले व निवेदनाद्वारे नमूद करण्यात आले की, अनेकांना गरीब व गरजूंना वेळेवर राशन मिळत नाही, तसेच विविध तांत्रिक अडचणी व नियमांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ योग्य कार्यवाही करून सर्व पात्र लाभार्थ्यांना नियमित व सुरळीत राशन वितरण सुनिश्चित करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी प्रवीण इंगोले, प्रमोद टाकसांडे, विक्की शंभरकर, स्वप्निल शेंडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी, प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास शिवसेनेतर्फे पुढील तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 6 2 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे