Breaking
चंद्रपूरनागपूरमहाराष्ट्रराजकियविदर्भ

रणमोचन येथील भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षप्रवेश

रजत डेकाटे- प्रतिनिधी

0 4 0 9 0 3

रणमोचन येथील भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षप्रवेश

ब्रम्हपुरीत भाजपला खिंडार – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश

रजत डेकाटे- प्रतिनिधी

ब्रह्मपुरी: राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांची सामाजिक बांधिलकी, सर्व समाजाला न्याय देण्याहेतू सुरु असलेले अथक प्रयत्न, सामान्यांप्रती असलेली आपुलकी, सामान्य कार्यकर्त्यांची जाण व क्षेत्रात सुरू असलेल्या विकास कामांचा झंजावत तसेच भोई समाजाला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत हजारोंच्या संख्येने मिळवून दिलेले घरकुले अशा विविध कार्यामुळे प्रेरित होऊन ब्रम्हपूरी तालुक्यातील रणमोचन येथील भोई समाजाच्या अनेक भाजप कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपूरी तालुक्यात हजारोंच्या संख्येने असलेल्या भोई समाज बांधवांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घरकुल मिळवून दिले. तसेच सर्व समाजाप्रती त्यांची आदर भावना, ब्रम्हपूरी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय, मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी विवीध विकासकामे, रोजगार, शिक्षण, आरोग्य अशा विविध कार्यातून त्यांनी मतदारसंघातील जनतेची मने जिंकली आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या सर्वसमावेशक सामाजिक, राजकीय व विकासात्मक दूरदृष्टीकोण तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अपेक्षांची जाण असणारा नेता म्हणून या सामाजिक भावनांनी प्रेरित होवून रणमोचन येथील भोई समाजाच्या भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

आयोजित प्रवेशाप्रसंगी मार्गदर्शन पर बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, मी सामन्यातून आलो असल्याने मला सामान्य कार्यकर्त्यांची जाण आहे. मला प्रत्येक समाजाला समान न्याय देणे, त्यांचा हक्क मिळवून देण्याची शक्ती ही तुमच्या कडूनच मिळाली आहे. तुमच्या विश्वासाला मी तडा जावू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी सर्व कार्यकर्त्यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काॅंग्रेस पक्षाचा दुपट्टा टाकून काँग्रेस पक्षात प्रवेश स्वीकारत स्वागत केले.

आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, जिल्हा काॅंग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे, बाजार समितीचे संचालक सोनू मेश्राम,अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सरचिटणीस डि.के.मेश्राम, माजी सरपंच मंगेश दोनाडकर, विलास मेश्राम, संदीप मांदाळे, माजी उपसरपंच तारकेश्वर तोंडरे, ग्राम काॅंग्रेस अध्यक्ष संजय प्रधान, पुरूषोत्तम मैंद, महेश प्रधान, परमात्मा संगतसाहेब, नामदेव गुरनूले, अमित दोनाडकर व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये विकास मेश्राम, देवानंद मेश्राम, रामचंद्र मेश्राम, गिरीधर दिघोरे, दिगांबर दिघोरे, दिनेश दिघोरे, सावजी मेश्राम, सुखदेव मेश्राम, जगदीश मेश्राम, विनोद मेश्राम, सुरेश शिवुरकार, सुभाष मेश्राम, दादाजी मेश्राम, आनंदराव मेश्राम, पंकज मेश्राम, कार्तिक मेश्राम, वामन मेश्राम, मनोहर तोंडरे, किशोर मैंद यांसह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे