0
4
8
2
8
6
लढाई संपलेली नाही
लढाई संपलेली नाही
कुणी कांहीही म्हणा
मतदारा तूच आहेस
लोकशाहीचा कणा…//
खरे जनतेचे तारणहार
असे सर्वश्रेष्ठ संविधान
इथेच तुझी निष्ठा हवी
फक्त याचे असू दे भान.. //
लोकशाही व्यवस्थेचा
एक तूच मजबूत धागा
धष्ट, पुष्ट, दुष्ट, भ्रष्टांना.
वेळीच दाव योग्य जागा.. //
पक्ष,व्यक्ती,नाती गोती
नको करू असा विचार
हवे सेवाव्रती तत्त्वनिष्ठ
राष्ट्रप्रेमी आचार उच्चार.. //
लोभी,स्वार्थी नको नेता
त्याची जाणावी योग्यता
दूरदृष्टी दृष्ट्या नेतृत्वाला
मतपेटीतून हवी मान्यता.. //
विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
0
4
8
2
8
6



