Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

पं.श्रीधर पार्सेकर व पं.विष्णुपंत कावळे स्मृती संगीत समारोह उत्साहात

स्मृती संगीत समारोहाला संगीत रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0 5 1 6 5 2

पं.श्रीधर पार्सेकर व पं.विष्णुपंत कावळे स्मृती संगीत समारोह उत्साहात

स्मृती संगीत समारोहाला संगीत रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर जिल्हा प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर: (दि १३ मार्च) प्रवीण कावळे व मित्र परिवारमार्फत आयोजित ५९ वे पं. श्रीधर पार्सेकर व पं. विष्णुपंत कावळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ संगीत समारोहाचे आयोजन रविवारी ८ मार्चला श्रीगुरुदेव सेवाश्रम येथे करण्यात आले.

प्रथम सत्रात प्रवीण कावळे यांचे शिष्य केतकी नाईक, राधा उपगडे, करण ओगानिया, कुणाल यावले, आकाश खरे यांनी सामूहिक व्हायोलिन वादनातून राग जयजयवंती, राग हंसध्वनी व राग पिलू मधील बंदिशींचे बहारदार सादरीकरण केले. तसेच श्री. कावळे यांनी राग श्याम कल्याण मधील विलंबित एकतालातील गत, छोटा ख्याल व राग देस वर आधारित दादरा सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.

द्वितीय पुष्पात नागपूरचेच प्रख्यात गायक अनिरुद्ध देशपांडे यांनी राग पुरिया कल्याणातील आलाप गुंफून गायनातून बारकावे सादर केले. त्यांनी या रागातील मोठा व छोटा ख्याल सादर केला. होळीचे औचित्य साधून होरी करून राष्ट्रसंतांच्या भजनाचे सादरीकरण करून उपस्थितांची वाह वाह मिळवली.

कार्यक्रमाचा समारोप यूएसचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्हायोलिन वादक पं. इंद्रदीप घोष यांच्या नाविन्यपूर्ण तंत्रकारी पद्धतीच्या सुरेख व्हायोलिन वादनाने झाला. त्यांनी व्हिओला या वाद्यावर राग अभोगी कानडा वरील जोड – झाला सादर केला. तद्नंतर व्हायोलिन वरील राग काफी कानडा वरील विलंबित तीनताल निबद्ध राग विस्ताराने श्रोते मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या सादरीकरणाचा शेवट राग भरावीतील राष्ट्रसंतांच्या भजनाने करून श्रोत्यांना मोहून सोडले. पं.गुणवंत घटवाई यांची संवादिनीवर, वेद ढोक, अथर्व शेष व मोहन कुर्वे यांची तबल्यावर समर्पक साथ लाभली. श्रीमती अंजली पारनंदीवार यांनी कार्यक्रमाचे निवेदन सांभाळले. कावळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला संगीत रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे