0
4
8
2
9
0
चमचम तारे
काळ्याशार आकाशात
चमचम लाखो तारे
प्रकाश त्यांचा
चोहिकडे पसरे ||१||
चम चम ताऱ्यांची
गम्मतच भारी
मोजायला गेलो
पसार झाली सारी ||२||
पौर्णिमेच्या राती
प्रकाश पडतो लख्ख
चमचम तारे जणू
लाईट लागले चक्क ||३||
मनात आले एकदा
जावे चंदामामा घरी
चमचम ताऱ्यांना
आणावे आपल्या घरी ||४||
चमचम ताऱ्यांची
घाबरगुंडी उडाली
अमावसेच्या रात्रीची
वाट पाहत बसली ||५||
सुनंदा किरसान
अर्जुनी मोर गोंदिया
0
4
8
2
9
0



