Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरनाशिकसाहित्यगंध

नैराश्य

सविता पाटील ठाकरे

0 4 8 2 9 0

नैराश्य

हा नियतीचा खेळ म्हणू की,आपली कर्म कहाणी
झेपेल तेवढे जगून घे तू,कशास अश्रू नयनी

उदास छाया स्मरू नको रे,सत्यवचन तू बोल
खुणवी तो किरण आशेचा,त्या मार्गाने चाल
जागवून विश्वास अंतरी,झेप घे गगनी
झेपेल तेवढे जगून घे तू,कशास अश्रू नयनी

वेळ बदलली काळ बदलला,त्यात भर तू आनंद
वादळवारे सारे झेलत,जनहित तू साध
वाण वाटत जा हर्षाचे,नैराश्य सोडूनी
झेपेल तेवढे जगून घे तू,कशास अश्रू नयनी

रवीराजाला पहा मानवा,मावळून पुन्हा उगवणे
परमेशाचे सुंदर जीवन,गा तू प्रीत तराणे
माळरानीही शोभा आण तू, रंग सृष्टीचे भरूनी
झेपेल तेवढे जगून घे तू,कशास अश्रू नयनी…

वाळवंटीही निवडुंग बघ, बहरतो आनंदाने
जीवन हे क्षणभंगुर, तेव्हा हसत खेळत जगणे
मिळेल तिथून ओंजळीत, घे सौख्यक्षण वेचूनी
झेपेल तेवढे जगून घे तू, कशास अश्रू नयनी

सविता पाटील ठाकरे
सिलवासा, दादरा नगर हवेली
======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे