Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननांदेडपरीक्षण लेखमराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक ‘शिवाजी शेषराव डावकरे’ सरांचा सेवापूर्ती गौरव

बळवंत शेषेराव डावकरे ता. मुखेड, जि. नांदेड

0 5 7 8 9 8

कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक ‘शिवाजी शेषराव डावकरे’ सरांचा सेवापूर्ती गौरव

‘दिव्यानेच दिवा पेटतो’ या उक्तीप्रमाणे स्वतःच्या ज्ञानज्योतीतून असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्यात संस्कार, ज्ञान, आत्मविश्वास आणि कर्तृत्वाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या या ध्येयवेड्या व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास प्रेरणादायी, कृतार्थ आणि अनुकरणीय आहे. संस्कारमय कुटुंबाची जपलेली परंपरा, ज्याप्रमाणे शाळेत त्यांनी ज्ञानाची गंगा वाहती ठेवली त्याचप्रमाणे स्वतःच्या कुटुंबातही शिक्षण आणि संस्काराचा वारसा जपला. ज्ञान, देह व मनाचा राष्ट्राच्या व समाजाच्या कल्याणासाठी उपयोग झाला; तरच जीवनाला खऱ्या अर्थाने सुख शांती आणि समाधान प्राप्त होते. भारतीय शिक्षण परंपरेतील हे तत्व आपल्या जीवनात उजळून जगणारे, ज्ञानाचा अखंड दीप स्वतःच्या अंतर्गत तेवत ठेवत हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रकाशाची नवी पहाट फुलवणारे, शिक्षणालाच आयुष्याचे व्रत मानणारे व्यक्तिमत्व म्हणजे माझे मोठे बंधू श्री शिवाजी शेषराव डावकरे.

समाज परिवर्तन मूल्य संवर्धन आणि राष्ट्रनिर्मितीचा पवित्र यज्ञ म्हणून त्यांनी शिक्षण सेवा स्वीकारली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, संस्थेची भरभराट यासाठी त्यांनी तब्बल ३० वर्षे निष्ठा, प्रामाणिकपणा, शिस्त, समर्पण आणि नि:स्वार्थ भावनेने हा ज्ञानयज्ञ अखंड तेवत ठेवून ३१ जुलै २०२६ रोजी ते मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.

आपल्या कार्यकाळात केवळ आपण नोकरीच केली नाही, तर आपल्यावर सोपविलेली प्रत्येक जबाबदारी मनापासून पार पाडलात. तुमच्या कर्तव्यनिष्ठ स्वभावामुळे, शिस्तप्रिय वृत्तीमुळे आणि सर्वांशी प्रेमाने वागण्याच्या गुणामुळे तुम्ही अनेकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केलात. तुमच्या सहकार्यांना, मित्रांना आणि परिचितांना तुमच्या कार्याची आणि स्वभावाची नक्कीच कायम आठवण राहील.

या सेवाकाळातील अनेक चढ-उतार, अडचणी, संघर्ष आणि जबाबदाऱ्या तुम्ही धैर्याने पार केलात. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना आपल्या कर्तव्यालाही तुम्ही नेहमीच योग्य न्याय दिलात. त्यामुळे आज तुमच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने तुमच्याकडे पाहताना आम्हा सर्वांच्या मनात अभिमान, आनंद आणि समाधान या तिन्ही भावना आहेत.

स्व.आ.कर्मवीर श्री किशनराव राठोड, स्व.आ.श्री गोविंदराव राठोड यांनी लावलेल्या या शैक्षणिक रोपट्याची अतिशय प्रामाणिकपणे जोपासना करण्याचे काम त्यांनी केले. संस्थेचे सचिव श्री गंगाधरराव राठोड, आ.श्री तुषार राठोड यांच्या सहकार्याने अडचणीवर मार्ग काढत आपण शिक्षणाची पायवाट चालत पूर्ण केली. आईवडिलांचे आशीर्वाद, सुसंस्कार व वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन, दोन्ही भाऊ (हणमंत, बळवंत) व बहीण जयश्रीबाई, मेहुणे शिवराज पाटील, वात्सल्याची मूर्ती सासरे स्व.गोविंदराव शेंडगे यांचे प्रेम व मिळालेली खंबीर साथ,पत्नी सुरेखा यांनी पाठीशी भक्कमपणे उभे राहून दिलेले पाठबळ, संस्कारीत मुलगा डॉ. कृष्णकांत व मुलगी प्रतिक्षा यांनी लावलेला लळा, भावजयी कमल व सुषमा तसेच आकांक्षा, श्रद्धानंद, विवेक, श्रीनिकेतन भाचा डॉ. श्रीकांत भाची दिपाली व रुपाली यांचा एकमेकांप्रती असलेला जिव्हाळा हे संयुक्त कुटुंबाच्या यशस्वीतेचे उत्तम उदाहरण आहे. आज पदावरुन जरी ते सेवानिवृत्त होत असले, तरी त्यांच्यातील गुरुजी कधीच निवृत्त होणार नाही. त्यांना निरोगी, आनंदी दीर्घायुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!!

बळवंत शेषेराव डावकरे
ता. मुखेड, जि. नांदेड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 8 9 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे