मालेवाडा येथील जि.प. शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न
रजत डेकाटे प्रतिनिधी भिवापूर/मालेवाडा
मालेवाडा येथील जि.प. शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न
रजत डेकाटे प्रतिनिधी
भिवापूर/मालेवाडा
नागपूर: (दि ७) भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा स्वातीताई सहारे यांच्या हस्ते करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी घरून बनवून आणलेले पदार्थ हे मेळाव्यात आणले होते. विद्यार्थ्यांनी बनवून आणलेल्या पदार्थांचा गावातील नागरिकांनी आस्वाद घेतला. या बाल मिळाव्यातून विद्यार्थ्यांचे गणितीय ज्ञान वाढविण्यासाठी आणि त्यांना नफा तोट्याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी बाल आनंद मेळावा घेतल्याचे शाळेचे मुख्याध्यापक सुरज येल्ले यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षिका भुमेश्वरी सातपुते, माधुरी इमाने, वर्षा चापले, शिक्षण सेवक अजय झोडापे व शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य रमेश लोनगाडगे,रामू लाखे, लहू सहारे, अरुण रामटेके,शंकर सहारे हे यावेळी उपस्थित होते.



