उमरेड येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती साजरी
रजत डेकाटे, उमरेड प्रतिनिधी

उमरेड येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती साजरी
रजत डेकाटे, उमरेड प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर: (दि १६): उमरेड येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मान्यवरांनी बिरसा मुंडा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.आझाद चौकातुन रॅलीला सुरुवात झाली. आदिवासी बांधवांनी नृत्य सादर केले. यावेळी मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
रॅलीची सांगता उमरेड तहसील कार्यालया जवळील असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ झाली. यावेळी राजेश वानखेडे,हरिष नान्हे, रोशन पाटील, गणेश पवार,सुनील मेश्राम, शेषराव टेकाम, सुरजलाल येल्ले,पवन मडावी, श्रीकृष्ण सयाम,कृष्णा पेंदाम गेडाम सर,पेंदारे सर, चंद्रशेखर सयाम, यशवंत नैताम, मंगेश कोकाटे,नितेश धुर्वे,श्रीराम कुंभरे,खुशाल सयाम, निलिमा पेंदाम, वंदना वरठी, संध्या कुंभारे आदी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





