सप्ताह सन्मानाचा आणि आनंदाचा; संध्या पाटील
मराठीचे शिलेदार समूहाच्या ऋणाईत
सप्ताह सन्मानाचा आणि आनंदाचा; संध्या पाटील
मराठीचे शिलेदार समूहाच्या ऋणाईत
आठवड्याभराचा सन्मान
पदरी सन्मानपत्रांचे दान
सरसावली लेखणी विसरून देहभान
स्वीकारावे हे माझे आनंदाचे पान
ऋणात मी आपल्या नेहमीच .. कितीही मानले आभार तरी शब्द कमीच. छ.संभाजीनगरीची जादू न्यारीच.. अजूनही नव्याने डोलतोय फेट्यातील “मुकुट” शिरीच..!!
सोमवारीय काव्य त्रिवेणी स्पर्धेत ” लपलेला सूर्य..” मंगळवारी बालकाव्य स्पर्धेत “मी’ढ’झालो तर…” बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेत “विद्रोही मी…” गुरुवारीय चित्रचारोळी स्पर्धेत “आमच्याही व्यथा..” शुक्रवारीय हायकू स्पर्धेतही … फक्त शनिवारची मात्र ‘स्वप्नपूर्ती’ काही झाली नाही.. पण तरी मी स्वतःला विजेती समजते की मी ‘लिहिले तरी.’. अशा प्रकारे हा आठवडा सन्मानाचा आनंद घेऊन आला होता.
खरेतर कार्यक्रमावरून आले तशी तब्बेत बरी नाही..पण लिखाण थांबले की नंतर लिहायला पटकन सुचत नाही आणि विषयही छानच मिळत होते..त्रिवेणीत मी मनोज सरांना संबोधूनच लिहिले होते की….
“लपलेला सूर्य तू नेहमीच माझ्यासाठी
आपली भेट मावळतीलाच ठरलेली
आता मात्र नभांत मेघांचीच दाटी..!
कारण, सर सकाळी ऑफिसला गेले की संध्याकाळीच ते ही कधी वेळेवर नाही येत आणि आता एक आठवडा तर कंपंनीच्या कामास्तव बाहेरच होते.. म्हणूनही कदाचित ही रचना जमून आली. “विद्रोही मी”..ह्या विषयात बऱ्याच अशा बायका मी पाहिल्यात त्यांची अवस्था खूप दयनीय आहे..सर्व असून नवऱ्याची साथ नाही,नातवंडे आलेत तरी नवऱ्याला विचारल्याशिवाय एक पाऊल घराबाहेर टाकू शकत नाहीत अगदी बनवलेलं जेवण.. ही नको दुसरी भाजी कर ती ही रात्री अकरा वाजता .असेही पुरुषत्व गाजवणारे नवरे बघितलेत..पण मग तेव्हा स्वतःला मी भाग्यवान समजते की मला मनोज सरांसारखे पती मिळाले.
या आठवड्यात मला जी आनंदाची पर्वणी लाभली त्यासाठी समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल दादा पाटील सर, आदरणीय पल्लवीताई, आ.सविताताई, आ.स्वातीताई, आ.वैशालीजी ताई,आ.वृंदा ताईसो, आ.तारका ताई, आ.शर्मिला ताई, आ.प्रतिमा ताई, आ.विष्णू दादासाहेब, आ.प्रशांतजी सर, आ.अरविंदजी दादा,आ.संग्राम दादा, आ.अशोकजी दादा, आ.विकास दादा आपणा सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. खूप खूप धन्यवाद..!!
कवयित्री ‘काव्यसाधना’कार
सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर
©मराठीचे शिलेदार समूह सदस्या





