
0
4
8
2
9
4
सूर्याची किरणे
काळ्या काळ्या ढगात
सुर्याची किरणे लपली
लपंडाव विजांचा झाला
चमचम धरणी प्रकाशली
मोकळ आभाळ भरलं
मोसम पावसाचा झाला
टपटप कोसळल्या गारा
मुसळधार पाऊस आला
दिवस मावळतीला आला
तरी दिसेना सुर्याची किरणे
दिवसाही रातच भासली
निसर्ग लिला निसर्गच जाणे
शाळेला सुट्टी मिळाली मुले
आनंदाने पावसात नाचली
अंगणात साचले खुप पाणी
कागदी नाव पाण्यात सोडली
प्रतिमा नंदेश्वर
ता. मूल जि.चंद्रपूर
0
4
8
2
9
4



