0
4
8
2
8
6
माझी शाळा
छान छान छान, आमची शाळा किती छान
मुलेही छान, मुलीही छान, गुरुजी किती छान…..!!धृ!!
गुलाब – जाई -जुई -चमेली बागेमधली फुले
तशीच आमच्या शाळेमध्ये, बागडती ही मुले
बाई आणखी गुरुजी तयांना धडे देती महान …!!१!!
नीटनेटकी शाळा अमुची, सुंदर तिला करू
शौचालये बांधून सारे गावही स्वच्छ करू
स्वच्छतेचा मंत्र पाळुनी, जगात राखू मान…..!!२!!
हिंदू मुस्लिम- सीख – ईसाई, सारे एकच आम्ही
भारतभूच्या गळ्यामधली सारीच पुष्पे आम्ही
अभिमानाने गाऊ सारे भारत देश महान….!!३!!
भुमेश्वरी सातपुते खोंडे
ता.उमरेड, जि.नागपूर
=========
0
4
8
2
8
6



