
0
4
8
2
8
6
आचरण
काय करू देवा
वेळ मिळत नाही हल्ली
असं म्हणत म्हणतच
थकून झोप लागली ..
पहाटे पहाटे
देवच स्वप्नात आला
समोर त्यास पाहून
मीही हात जोडला..
खरंच देवा माफ कर
खूप कामं वाढली
नामस्मरण होईना
कामाने पुरती वेढली..
अगं वेडे.. मलाही
कळतेय तुझी धावपळ
म्हणूनच तुला भेटायला
मुद्दाम काढलाय वेळ..
कष्टावरच श्रद्धा अन्
मायेनं भरलेलं मन
प्रामाणिक काम करणं
अन् सत्य मार्गक्रमण..
या सगळ्या ठिकाणी
माझाच तर वास आहे..
तू हे सगळं सांभाळते
हा तुला लागलेला
माझाच तर ध्यास आहे..
तू कर अथवा करू नकोस
माझे नामस्मरण..
मी तुला नक्कीच भेटणार
फक्त शुद्ध ठेव आचरण..!
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर पुणे
0
4
8
2
8
6



