‘गती’ची ‘हम तुम लाईफ टाईम’ नवीन बॅटरी लाँच
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
‘गती’ची ‘हम तुम लाईफ टाईम’ नवीन बॅटरी लाँच
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग (दि १८ रायगड): साधारण 14 ते 15 वर्षांपूर्वी बॅटरी इंडस्ट्रीचा एक नवीन तरंग उठला, एक नवीन दिवा लावला गेला. प्रस्थापित बॅटरी इंडस्ट्रीज आधीच खूप मोठी होती, त्यांच्या आपली पणती लावून ती मोठी करणे हे त्यावेळी मोठेच चॅलेंज होते. पण ‘गती’ बॅटरी टेकने ते धाडस केले आणि ते धाडस करताना त्यांनी आपला यूएसपी ठेवला होता,’क्वालिटी इज अ मंत्रा’.
कारण गतीचे संचालक श्री प्रदीप कटारिया ना पक्के माहीत होते की एवढ्या मोठ्या मोठ्या दिग्गजांच्या रांगेत जर आपल्याला उभे राहायचे असेल आणि नुसतेच उभे राहायचे नाही तर चालायचे धावायचे असेल तर सगळ्यात पहिला मंत्रा जपायला हवा तो क्वालिटी हाच. आणि मग सुरू झाली पंधरा वर्षाची अखंड मेहनत आणि एकच ध्यास गती बॅटरी हा ब्रँड मोठा करणे आणि त्या कालावधीत गति प्राईम गती ट्रस्ट गती मारवल गती रॉयल असे वेगवेगळे ब्रँड वेळोवेळी लॉन्च करत राहून त्यांनी गतीची घोडदौड चालू केली. आणि आज फक्त महाराष्ट्रातच नव्हे किंवा भारतातच नव्हे तर 17 देशात आपल्या क्वालिटीने आपल्या प्रॉडक्ट्सचे जाळे पसरवले.
नुकतीच गती बॅटरी टेकने गोवा येथे भव्य डीलर मिट आयोजित केली होती ती कशासाठी होती त्याचे नवीन टार्गेट्स काय होते तर गति इंडस्ट्रीला 200 करोडच्या लाईनीत नेऊन बसवणे आणि त्यासाठी तसेच मार्केटमध्ये टक्कर देऊ शकतील असे ब्रँड लाँच करणे आणि म्हणूनच या मीटमध्ये त्यांनी बिग बँक केला दोन असे मोठे ब्रँड लाँच केले की ज्यामुळे अख्खी इंडस्ट्री त्यांच्याकडे अवाक होऊन पाहत राहीले. गती मारवल ज्याला 72 महिने वॉरंटी आहे आणि गती हम तुम आज इंडस्ट्री मध्ये लाईफ टाईम वॉरंटी असलेला गती हा एकमेव ब्रँड आहे.
खरोखर पंधरा वर्षात 200 करोड चे टार्गेट ठेवण्याची हिंमत करण्यात एवढे यश मिळवणे हे दैदीप्यमान आहे आणि ते आहे सतत कॉलिटी जपण्याचे ध्येय ध्यास आणि कष्ट यांचे फलित. आणि हे करताना गती इंडस्ट्रीजला त्यांच्या वितरकांच्या रूपाने जे पार्टनर्स मिळाले आहेत तेही सोन्याच्या कोंडण्यात हिरे बसवावेत असे आहेत ह्या एवढ्या मोठ्या यशात ह्या सगळ्या वितरकांचा सिंहाचा वाटा आहे.
गोव्यात 180 डीलर्सची जी प्रचंड मीट झाली, त्यात हे वारंवार जाणवत होते.आणि या यशातही सिंहाचा वाटा होता तो आपल्या रायगड मधील दोन मोठ्या डिस्ट्रीब्युटर्सचा पावर बॅटरी सर्विसेस अलिबाग चे श्री राहुल नाईक आणि हायटेक पॉवर सिस्टिम पनवेलचे श्री प्रमोद पाटणकर या दोघांनी फक्त रायगड या एका जिल्ह्यातून 30 डीलर्स ना या मेटसाठी नेले होते, यातच त्यांच्या गतीसाठी असलेल्या यशातील वाटा सिद्ध होत होतांना उठून दिसत होता.



