Breaking
कवितानागपूरमराठवाडासाहित्यगंध

बलिदान; अस्मिता हत्तीअंबिरे

परभणी

0 4 8 2 8 6

बलिदान

भारत मातेचे वीर जवान
प्राण पणाने रक्षण देशाचे
विसरून सारे देहभान
आहे आम्हास अभिमान

तमा नसे परिवाराची
आणि चीमुकल्या पिल्लांची
सदा आत्मसमर्पण देशासाठी
गहिवरतो सारा आसमंत

तमा नाही प्राणाची
थंडी ऊन वारा,पावसाची
सुरु असते तुमची गस्त
तुम्हा मुळे आम्ही घरात व्यस्त

स्वतः साठी जगतो आम्ही
बलिदान देण्या देशासाठी
लागते निधडी छाती
आणि वाघाचेच काळीज

दीन राती पहारा
नाही कुणाचा सहारा
चालून येता दुश्मन
करितो त्यांना आडवा

मृत्यू आहे जीवनाचे
अंतिम सत्य हे कळलं
तिरंग्यात लपेटून दिल बलिदान
वाचवली भारत भूमीची अस्मिता

वीर पुत्र भारत मातेचे
व्यर्थ न जाई तुमचे बलिदान
आहे आम्हास अभिमान
कोटी कोटी प्रणाम तुम्हा
कोटी कोटी……..

अस्मिता हत्तीअंबिरे, परभणी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे