नव्या वर्षातील नवे संकल्प, नवी आशा
तृप्ती पाटील मालाड (ईस्ट) मुंबई

नव्या वर्षातील नवे संकल्प, नवी आशा
नवीन वर्षाच्या नवीन वाटा, नवीन वर्षामध्ये प्रथम आपल्या वेळेला बंधन ठेवा. आळसपणा सोडून द्या. चांगले कर्मं करा. वेळेचे नियम पाळा. ‘कारण वेळ ही अशी आहे की ती गेल्यानंतर परत आपल्या जवळ येत नाही’. प्रत्येक वेळेचा सदुपयोग करा. मोबाईलमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवू नका. यात तुमचा जास्त वेळ जातो. जास्तीत जास्त लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करा. नवीन वर्षासाठी एकच ध्येय ठेवा आणि त्यावर्षी तुम्ही ते ध्येय पूर्ण करण्याचा प्रयास करा. एखाद्या ग्रंथाचे वाचन चालू करा. त्या ग्रंथाचा अभ्यास करा. एखादा ‘प्रोजेक्ट’ तुम्ही हातात घेतलं असेल त्या प्रोजेक्टवर कार्य करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळेवर बंधन ठेवा. रिकामा वेळ घालू नका. प्रत्येक वेळेचा मिनिटाचा सदुपयोग आपल्याला कसा करता येईल याकडे लक्ष द्या.जास्तीत जास्त नामस्मरण करा.
या वर्षांमध्ये मी अकरा कोटी जप करणारच किंवा 13 कोटी मी जप करणारच असा निर्धार धरा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं नामस्मरण किंवा मंत्र जप करत रहा.जीवनात जर तुम्हाला खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल; तर तुम्हाला वेळेचे बंधन पाळने गरजेच आहे. जो वेळेनुसार चालतो, वेळेनुसार आपलं कर्म करतो तो जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. मोबाईल मध्ये घाणेरडे रिल्स तासान तास पाहत बसणे यावर बंधन ठेवा. आपल्याला पुण्याची प्राप्ती कशी होणार आपले विचार मंथन शुद्ध कशी होणार त्यासाठी जास्तीत जास्त मोबाईलचा वापर करा. पण अतिवापर करून आपले डोळे खराब करू नका.त्यापेक्षा भगवद्गीता वाचा. तुकाराम गाथा वाचा. ज्ञानेश्वरी वाचा.त्याचा अभ्यास करा.
एखादा निर्धार करा की, मी यावर्षी उत्तम कर्म करणार. कुणाला फसवणार नाही. कुणाला टोमणे देणार नाही. लांडीलबाडी करणार नाही. कुणाचं मन दुखवणार नाही हा संकल्प करा. ह्याच्यातला एक गुणांचा संकल्प जरी तुम्ही केला. तरीही तुमच्या मनाला शांती लाभेल आणि ती शांती तुम्हाला अध्यात्माकडे वाटचाल करून देईल. जीवन हें क्षणभंगुर आहे. जीवनात माणसाला कोणत्याही गोष्टीची शाश्वती नाही. म्हणून जास्तीत जास्त कर्म चांगलं कसं होईल त्याकडे लक्ष द्या. “कर्मं तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है”. या म्हणीप्रमाणे तुमचं कर्म उत्तम करा. प्रत्येक वेळ न वेळ मिनिटं मिनिट उत्तम कर्म करण्यासाठी घालवा. आपल्या मुलांना वेळ द्या.आपल्या घरच्यांना वेळ द्या. मुलांना कसे चांगले संस्कार मिळतील याकडे लक्ष द्या.
एकच बंधन मनावर ठेवा की मी जास्तीत जास्त मोबाईलचा वापर करणार नाही. तो वेळ मी परोपकार करण्यासाठी, लोकांना मदत करण्यासाठी घालवणार. चांगले ग्रंथ, मासिक वाचा. जेणेकरून आपली बुद्धी तीक्ष्ण होईल.जीवनात तुम्हाला प्रत्येक क्षेत्राचे यशस्वी व्हायचं असेल, तर न डगमगता, न हरता प्रत्येक दुःखाला सामोरे गेलं पाहिजे. हा सर्वात मोठा संकल्प धरा. दुःख येणार आणि जाणार पण मनात जर तुम्ही भित्रेपणा मोडला आणि त्या प्रत्येक दुःखाला सामोरे गेलेत तर तुमच्या आयुष्याचं सोनं नक्कीच होणार. मी माझ्या आई-वडिलांची सेवा करणार. मी माझ्या बायकोला, नवऱ्याला दुखावणार नाही. मी माझ्या मुलांना चांगले संस्कार देणार हा संकल्प नवीन वर्षासाठी किंवा तुमच्या पुढच्या जीवनासाठी धरून ठेवा. नव्या वर्षातील नवे संकल्प पूर्णत्वास येण्यासाठी तुम्ही वेळेचा सदुपयोग करणे गरजेचे आहे.
तृप्ती पाटील
मालाड (ईस्ट) मुंबई



