Breaking
कविताकोकणनागपूरमहाराष्ट्रमुंबईविदर्भसाहित्यगंध

थडग्याची व्यथा; मृदुला कांबळे

0 4 8 2 9 7

थडग्याची व्यथा

दगड,माती नाही नुसती
चिरनिद्रिस्ताची ही कथा…
शरीराचे वास्तव्य सोडून
गेलेल्या आत्म्याची व्यथा….

जगात किती असे मनुष्य
वाटते जणू थडगे जीवंत…
डोळे भकासपणे बघतात
देह बधीर पण यातना अनंत..

तारूण्यच्या उंबरठ्यावरच
लचके तोडून खाल्ले जिचे…
थडग्यासम झाले आहे आता
रूक्ष, मातीमोल स्वप्न तिचे…

एकतर्फी प्रेमातून घातपात
सुदंर चेहरा केला विद्रुप…
काय करावे तिचे सांत्वन
देहाला आले थडग्याचे रूप….

काही थडगे असे असतात
इथे मन मारूनच जगतात..
अठरा विश्व दारिद्र्यात जगले
मायावी जग लांबूनच बघतात..

असे किती आणि कुठे कुठे
विभिन्न अवस्थेत थडगे सापडतात..
वृद्धाश्रम, रूग्णालय उच्चभ्रू घरात
भावना क्रूरपणे पुरल्या जातात..

काय करावे त्यांच्या करिता
प्रारब्ध भोगाची ही सारी प्रथा…
ह्या सर्वापेक्षा उत्तमच म्हणावी
त्या निर्जीव थडग्याची व्यथा…

मृदुला कांबळे
गोरेगांव -रायगड
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे