Breaking
क्रिडा व मनोरंजनपुणेमहाराष्ट्रसाहित्यगंध

डाॅ. घाणेकर, तेलंग, आपटे, डांगी, गायकवाड यांना वाजपेयी जन्मशताब्दी पुरस्कार प्रदान

वसुधा नाईक,प्रतिनिधी पुणे

0 4 8 2 9 4

डाॅ. घाणेकर, तेलंग, आपटे, डांगी, गायकवाड यांना वाजपेयी जन्मशताब्दी पुरस्कार प्रदान

वसुधा नाईक,प्रतिनिधी पुणे

पुणे : तब्बल 50 वर्षांहून अधिक काळ
‘राष्ट्रहित प्रथम’ हे अंतिम उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रखर राष्ट्रवादी विचारसरणीने,निरपेक्ष भावनेने सामाजिक कार्यासाठी योगदान देणा-या डाॅ.मधुसूदन घाणेकर , श्रीनिवास तेलंग, उर्मिला आपटे,मदन डांगी आणि पोपटराव गायकवाड या 5 कर्तबगार कार्यकर्त्यांना भारतीय विचारधारा संस्थेतर्फे भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी जन्मशताब्दी पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

सदर पुरस्कार वितरण भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. भारतीय विचारधारा संस्थेच्या संस्थापक – अध्यक्ष भारती महाडिक यांनी प्रास्ताविक आणि अतिथी स्वागत केले. याच सोहळ्यात डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित डहाळी अनियतकालिकाचा 530वा अंक प्रकाशित करण्यात आला.

आत्मनिर्भर भारत संस्थेतर्फे संस्थापक अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर आणि बीजेपी ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांच्या शुभहस्ते बीजेपी महिला आघाडी कार्याध्यक्ष भारती महाडिक यांना स्वयंसिध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ल्ड हनी बीजच्या अध्यक्षा सारिका सासवडे यांनी सूत्रसंचालन केले.

प्रारंभी सुधीर पाचपोर यांनी वैयक्तीक पद्य सादर केले.उपमहापौर सुरेश नाशिककर, तितिक्षा इंटरनॅशनल.च्या संस्थापक अध्यक्ष प्रिया दामले, वसुधा इंटरनॅशनलच्या अध्यक्षा वसुधा नाईक, महिला सन्मान संस्थेच्या सचिव दीपाराणी गोसावी, सहसचिव सुचेता प्रभुदेसाई, बीजेपी.च्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मीराताई पावगी रा.स्व.संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अजित करंदीकर तसेच बीजेपी ज्येष्ठ नागरिक आघाडीचे तुळशीराम उणेचा, श्रीकांत कुलकर्णी, पुरूषोत्तम पिल्ले , बाळ भिंगारकर, रविंद्र भगवान, विजय जाधव आदि पदाधिकारी उपस्थित होते. प्रिया दामले यांनी आभार मानले.दीपाराणी गोसावी आणि अजया मुळीक यांनी संयोजन केले.

4/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे