“सुखद भावनांची बरसात”महिला विभागातर्फे आगळा- वेगळा जागतिक महिला दिन साजरा
श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळ श्याम नगर तर्फे आयोजन
“सुखद भावनांची बरसात”महिला विभागातर्फे आगळा- वेगळा जागतिक महिला दिन साजरा
श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळ श्याम नगर तर्फे आयोजन
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर: (दि १३) श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळ श्याम नगर, मनीष नगर, नागपूर येथील महिला विभागा तर्फे एक आगळा वेगळा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यात 10 पती आणि पत्नी जोडप्यांनी “सुखद भावनांची बरसात” हा कार्यक्रम अतिशय देखण्या रीतीनें सादर केला.
या कार्यक्रमाची संकल्पना, लिखाण, संवाद, दिग्दर्शन व सादरीकरण प्रा. सौ. अबोली फाळके यांची होती. या जोडप्यांच्या आयुष्यात घडलेल्या सुख दुःखाच्या घटनांची योग्य सांगड घालत व त्या घटनांना साजेसे मराठी हिंदी सिने गीत गुंफून छान पटकथा व संवाद तयार वरून महिलांचे कौतुक त्यांचाच पत्नीच्या मुखातून वदवून घेतले.
या उत्कृष्ट सादरीकरणातून ज्येष्ठ नागरिक व प्रेक्षक अंतर्मुख होऊन कधी हसून तर कधी डोळ्यात अश्रू आणून प्रतीसाद देत होते. यात सौ. गीताताई व अशोक कातुरे, सौ. माधवी व माधव पंचभाई, अनिल व सौ.अंजली कमाने, संजय व सौ. स्नेहल केळापुरे, सतीश व सौ. माधुरी कोटपल्लीवार, प्रशांत व सौ.अनितापांडे, अरुण व सौ. अबोली फाळके, केशव व सौ. विमल चिमुरकर, मधुकर व सौ. मीनाताई देशमुख तर विश्वनाथ बेले यांनी छान अभिनय केला.
पार्श्वगायन मिलिंद भूत व सौ.अबोली फाळके यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती कुंदाताई नाडगीर होत्या. तर प्रमुख अतिथी उच्च न्यायालयाच्या सुप्रसिद्ध विधिज्ञ श्रीमती स्मिताताई देशपांडे होत्या. या कार्यक्रमात कर्तृत्ववान महिला सौ. वर्षा बच्चेवार, सौ. स्नेहल गुंडावार, सुप्रसिद्ध होमिओपॅथी डॉ. आस्था फाळके यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक महिला तर्फे ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान व तेली समाजा तर्फे घेण्यात आलेल्या “मातृत्व व कर्तृत्व स्वामिनी तुला प्रणाम” कार्यक्रमात नृत्य सादरीकरण करणाऱ्या महिलांचे द्वितीय क्रमांक मिळविल्या बद्दल मंडळा तर्फे कौतुक करण्यात आले.
याप्रसंगी नृत्य सादर करून प्रेक्षक मंडळीकडून प्रशंसा मिळविली. कार्यक्रमाची सुरुवात सौ.अबोली फाळके यांनी गायलेल्या मानव गीताने झाली. स्वागतगीत सौ.माधवी पंचभाई, सौ.अलका गुंडावार, श्रीमती अपर्णा शेंडे व सौ. शीला जोशी यांनी सादर केले. सौ. माधुरी कोतपल्लीवार महिला प्रमुख यांनी उत्कृष्ट संचलन केले तर आभार सौ. मीनाताई देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली.



