Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूर

श्रीगुरुदेव सेवामंडळ, नागपूर पुरस्कृत पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

नागपूर शहर प्रतिनिधी

0 5 6 4 5 7

श्रीगुरुदेव सेवामंडळ, नागपूर पुरस्कृत पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर (दि १ एप्रिल) : श्रीगुरुदेव सेवा मंडळ, नागपूरच्या वतीने 30 एप्रिल या तारखेस ग्रामजयंतीच्या निमित्ताने दरवर्षी समाजात सेवा भावनेने समर्पित कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी राष्ट्रसंत जीवन सेवाव्रती पुरस्कार, सामुहिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचार प्रचार करणाऱ्या संस्थेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचार प्रचार पुरस्कार, संगीत, भजन व प्रबोधनात्मक कार्यासाठी अण्णाजी माहुलकर संगीत रत्न पुरस्कार तसेच निर्भीड पत्रकारितेसाठी देशभक्त वामनराव गावंडे पत्रकारिता पुरस्काराने गौरव केला जात असतो निवड झालेल्या व्यक्ती / संस्थांना ‘ग्रामजयंती’ कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात येतो.

पुरस्कारासाठी व्यक्ती अथवा संस्थेने दि. 20 एप्रिल 2026 पर्यंत आपल्या कार्याचा अहवाल नागपूर येथील श्री गुरुदेव सेवाश्रम, सुभाष पथ, गणेशपेठ या पत्त्यावर पाठवावा असे आवाहन श्रीगुरुदेव सेवामंडळ, नागपूरच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पदवाड यांनी केले आहे. प्रस्तुत पुरस्कार 30 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या ‘ग्रामजयंती’ सोहळ्यात वितरित करण्यात येईल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 6 4 5 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे