
0
5
1
7
5
8
उगी उगी
का पाणी डोळा
उगी उगी बाळा
काय झालं सोनुल्याला
रडू नको लडिवाळा.
हात ग ताई !
चिडवू नको बाळाला
बाळाचा घोडा
देणार नाही तुला.
बघ आली चिऊ
तिला देऊ खाऊ
एक घास चिऊला
एक घास बाळाला.
मनीमाऊ मनीमाऊ
बस जरा इथे
बाळ खातो दूध भात
उरलेला तुला देते.
उगी उगी बाळा
झोपाळ्यावर बसू
झोके घेत घेत
खुदु खुदु हसू.
विमल धर्माधिकारी
वाई,जि.सातारा
0
5
1
7
5
8



