Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरनागपूरपरीक्षण लेखमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

जेन – झी: धाडसी तरूणाई

कुसुमलता दिलीप वाकडे दिघोरी रोड, नागपूर

0 5 7 4 4 8

जेन – झी: धाडसी तरूणाई

ऑर्टिक्ल 32 हे भारतीय संविधानातील असे एक ब्रम्होसत्र आहे. सत्तेवर बसलेला कुठलाही राजा एका सेकंदात रंक बनू शकतो. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील दृष्टिकोनातून विचार करून जर उद्या कुणी नेत्याने राजा बनण्याचा प्रयत्न केला, तर असे कलम लिहून ठेवले की, ऑर्टिक्ल 32 देशाला कसे वाचवू शकते. जर काही कारण नसताना पोलीस लाठीचार्ज करीत असेल तर पूर्वीची 144 धारा व आताची 143 धारा यात जी आपणास जबरदस्ती लादून आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्यास आर्टिकल्स 91 A हे बोलण्याचे स्वातंत्र्य , 91 B हे सांघिक एकत्र होण्याचा हक्क जर दाबल्या जात असेल तर अशा वेळेस आर्टिकल्स 32 हे काम करते. जर अशा वेळेस सरकारनी या सर्वाचे पीडीएफ फाईल, पिटीशन हजारो लोकांचे सुप्रीम कोर्ट याला टाळू शकत नाही. हे संविधानात नोंद आहे. डाॅ. अमोल कोल्हे आपल्या कवितेतून म्हणतात,” पता चला किसी शहंशाह को काॅक्रोच से डर लगने लगा है, अजीज प्रधान तो सिर्फ मोहरा है भरोसा आपसे टुटने लगा है!”

काॅक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) जंतरमंतर नंतर संसद भवनावर काढलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी शब्दशः हजारो जेन झी मुले मुली सामील झाल्यात. या आंदोलनात तरुणाईची अस्वस्था आणि व्यवस्था बदलाची इच्छा या दोन गोष्टी ठळकपणे दिसून येतात. आपल्या मागण्या शांततापूर्ण आणि सनदशीर मार्गाने मांडण्याच्या अधिकाराच्या बाबतीत जागरूक असलेली ही तरूणाई आहे. लोकप्रतिनिधींकडून चुका झाल्या तर त्यांना जबाबदार धरण्यासाठी आवश्यक सजग नागरिकांचे कर्तव्य ही तरूणाई जोशात निभावते आहे. या दोन्ही गोष्टी लोकशाहीच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. सर्वशक्तिमान भासणारे सरकार सरतेशेवटी आपण निवडून दिलेले सेवक आहेत त्यांनी नीट काम केले नाही तर आपण त्यांना बदलू शकतो.आपल्या सगळ्याना सातत्याने विसर पडणारी ही गोष्ट आहे.या देशाच्या ‘जेन झी’ ने आपल्या सगळयांना पुन्हा एकदा जागरूक जनता काय करू शकते यांची एक झलक दाखवली आहे.

‘सीजेपी’ ने हाती घेतलेल्या शिक्षण व्यवस्थेमधल्या अनागोंदीला असंख्य पदर आहेत. परीक्षांचे पेपर फुटणे आणि त्याचे उत्तरदायित्व नक्की करणे हा त्याचा महत्वाचा एक भाग आहे. पण त्या पलीकडे शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण व त्यामुळे न परवडणारे शिक्षण, शिक्षणाच्या गुणवत्तेचा घसरता स्तर, शिक्षण आणि रोजगार यांचा तुटलेला सांधा उच्च शिक्षणामधला जातीय भेदभाव, भारतीय ज्ञान पध्दतीचा नावाखाली मोठ्या प्रमाणात अवैज्ञानिक गोष्टी घुसविणे यासारखे प्रश्न आहेत. सरतेशेवटी सीजेपी पुढचे सर्वात मोठे आव्हान आहे. ते आंदोलनाचे राजकीय आकलन आणि भूमिकेचे कोणीही काही म्हणो अशा स्वरूपाचे आंदोलन कधीच अराजकीय असू शकत नाही.

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या तरूणांच्या आंदोलनाने आता निर्णायक वळण घ्यायला सुरुवात केली आहे. सरकारसोबतच्या चर्चेच्या दुसर्‍या फेरीत त्याच्यां तीन मागण्यांना तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रूपयांची आर्थिक मदत, आंदोलकाविरोधात दाखल केलेले ‘एफआयआर’ मागे घेणे आणि आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही व्यक्तीला भविष्यात लक्ष्य केले जाणार नाही. यांची सरकारकडून लेखी हमी या मुद्द्यांचा आंदोलकांच्या मागण्या मध्ये समावेश होता. पेपरफुटीवरून देशभरात सुरू असलेल्या तरूणाईच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला.”इस सरकार मे इस्तीफे नही होते.” संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचे हे विधान..आठवतेय? सभेला अहंकाराची बाधा झाली की तिच्या पतनाला सुरुवात होते. भारताची तरूण पिढी ही देशाची मोठी ताकद आहे.

कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 4 4 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे