ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध
एक मिठी प्रेमाची
गोवर्धन तेलंग पांढरकवडा.जि,यवतमाळ

0
5
4
0
9
9
एक मिठी प्रेमाची
कसे जगावे जीवन
झाली जिंन्दगी हैराण।
सभोवती ठाकलेले
दिसे सारेच हैवान।।
सखा परका कोण रे
ओळखाया येत नाही।
मायेने ज्यास बघता,
तोही वटारूनी पाही।।
जरी हासून बोललो,
तरी बेजार करतो।
सारं सहन करुनी,
व्यथा तयांची भोगतो।।
जळायाची जनमनी
जळे धगधगती आग।
हळूच फना काढतो,
बिळात विषारी नाग।।
श्वासात शोधला मी
स्पंदनातील पावणा।
एक मिठी प्रेमाची रे
माझे उजळे जीवना।।
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा.जि,यवतमाळ
0
5
4
0
9
9



