Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनमुंबई

ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजमध्ये ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ उत्साहात साजरा

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 5 1 6 5 2

ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजमध्ये ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ उत्साहात साजरा

​’स्त्री ही एक व्यक्ती आहे’ : प्रा. डॉ. प्रविण गायकवाड यांचे प्रतिपादन

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग: (०९ मार्च २०२६) जागतिक स्तरावर महिलांच्या सन्मानार्थ साजरा होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे’ औचित्य साधून, अलिबाग येथील जनता शिक्षण मंडळाच्या ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ येथे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विशेष वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना जे.एस.एम. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रविण गायकवाड यांनी “स्त्री ही एक व्यक्ती आहे,” असे प्रतिपादन करत स्त्री-पुरुष समानता केवळ कायद्यात न राहता ती समाजाच्या मानसिकतेत बिंबविणे गरजेचे असल्याचे आवाहन केले.

महिला सक्षमिकरणाविषयी ​बोलताना डॉ. गायकवाड यांनी प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका सिमॉन दि बोव्हा यांचा संदर्भ दिला. स्त्रियांचे उपेक्षितीकरण टाळण्यासाठी त्यांना ‘व्यक्ती’ म्हणून सन्मान देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर वक्तृत्व शैली विकसित करताना विषयाचे ज्ञान श्रोत्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सादरीकरण प्रभावशाली असणे गरजेचे आहे, असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. नीलम म्हात्रे यांनी एम्मा वॅटसन यांच्या जगप्रसिद्ध ‘HeFORShe’ चळवळीचा दाखला देत, स्त्रियांच्या सक्षमीकरणात पुरुषांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित केले. कार्यक्रमाचे आभार व्यक्त करताना प्रा. डॉ. संदीप घाडगे यांनी स्त्री आणि पुरुष या दोघांनीही एकमेकांना सहकार्य करत विकास साधणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.

‘महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समता’ या मुख्य विषयावर आधारित या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ‘जागतिक स्तरावरील महिला नेतृत्वाची व्याप्ती’, ‘२१ व्या शतकातील महिलांच्या बदलत्या भूमिका’ आणि ‘महिलांविषयक बदलणारे कायदे’ यांसारख्या विषयांवर आपले परखड विचार मांडले. या स्पर्धेत कु. प्रथमेश पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला, तर कु. आर्या पाटील आणि सौ. नेहा पाटील यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील आणि विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नीलम हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन महिला विभाग आणि अंतर्गत समिती प्रमुख प्रा. पियुषा पाटील यांनी केले. यावेळी प्रा. कौशिक बोडस, प्रा. सुरज पुरी यांच्यासह,विद्यार्थी प्रतिनिधी कु.आर्य पाटील, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे