0
4
8
2
9
7
दुःख सांगायचं कुणाला?”
कुणाला सांगावं दुःख,
कळत अजून नाही,
जगात तर कोणी
आनंदी दिसत नाही.
कुणी आनंदी जगलं,
इतिहासात नोंद नाही,
देवही दुःखात जगताना
दिसतो कधी काही.
शारीरिक व्याधींवर
औषधं सापडतात,
मनाच्या जखमा मात्र
सांगून सावरत नसतात.
नकळत कधी कधी
होतो अपमान आपला,
तो पचवावा तरी कसा
हे सांगावं कुणाला?
म्हणे, “दुःख कमी होतं
सांगितल्यावर दुसऱ्याना,”
पण बघतोय दुःखाचं
लोक भांडवल करताना.
डॉ. बालाजी राजुरकर
हिंगणघाट जि. वर्धा
=======
0
4
8
2
9
7



