0
4
8
3
0
2
लेखणीचा घाव
अन्याय अत्याचाराला
आलाय इतका ताव
विद्रोही अंगार फुलू दे
घाल लेखणीचा घाव.. //
नको मुळी हुजरेगिरी
बाणेदार बाणा दाव
रोखठोक खडे बोल
लेखणीचा हाच भाव.. //
प्रलोभनाची भीक टाळ
विकू नको शब्द बेभाव
प्रबोधनाचा विडा उचल
पिडितांच्या हाकेस धाव.. //
मुक्त स्वतंत्र अभिव्यक्त
सत्याचाच हवा प्रभाव
मात्र मनमानी सत्तेचा
वेळीच झुगारावा दबाव.. //
अनर्थकारी अर्थ योजन
लाचखोरीची नको हाव
शब्द सामर्थ्याचा डंका
अधर्मी लंकेस आग लाव.. //
शब्द एक शास्त्र आहे
तर्कशुद्धतेला हवा वाव
वेळप्रसंगी शस्त्र बनून
दुष्टदुर्जनांचा घ्यावा ठाव.. //
निष्पक्ष, निर्भिड, लिहावे
कुणी रंक असो वा राव
इतिहासाच्या पानावरती
कोरले जावे ठळक नाव… //
विष्णू संकपाळ बजाजनगर
छ. संभाजीनगर
============
0
4
8
3
0
2



