
0
5
1
7
9
4
सूर्यकिरण
सूर्यकिरण डोकावून
म्हणतात ऊठ मला
आरोग्य धनसंपत्ती
विचार कर ना भला
सकाळची सूर्यकिरणं
ऊर्जादायी प्रेरणादायी
लवकर उठून रे पळणं
असतंय रे आरोग्यदायी
आरूषीचं रूप गोजिरे
डोळे भरून रोज पहावे
आनंद सोहळा साजिरे
गुलाबपुष्प चरणी वहावे
सूर्यकिरणांचा प्रेमळस्पर्श
स्वागत करितो मी सहर्ष
तुझ्याविना या जीवनाचा
होईल कसा सांग उत्कर्ष
सूर्यकिरणांची रे महानता
चैतन्यदायी ती शालीनता
स्पर्शाने जागृत होते मनी
आदर्शवादी खरी मानवता
श्री.संग्राम कुमठेकर
जिल्हा लातूर
0
5
1
7
9
4



