Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजन

महाविद्यालयात रॅगिंग करणे हा कायदेशीर गुन्हा; प्राचार्या ॲड. निलम हजारे

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 8 6

महाविद्यालयात रॅगिंग करणे हा कायदेशीर गुन्हा; प्राचार्या ॲड. निलम हजारे

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: जनता शिक्षण मंडळाचे जे. एस. एम. महाविद्यालय व ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेज, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंग संदर्भात जनजागृती व्हावी या हेतूने अँटी-रॅगिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत असताना प्राचार्या ॲड. निलम हजारे यांनी प्रतिपादन केले कि, महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी रॅगिंग करणे हा कायदेशीर गुन्हा आहे.

त्या पुढे म्हणाल्या कि, जे विद्यार्थी रॅगिंग प्रकरणात दोषी आढळतात त्यांना कायदेशीर व विद्यापीठ अनुदान आयोगाने केलेल्या तरतुदीनुसार शिक्षा होऊ शकते. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात रॅगिंग करणे जसे अयोग्य आहे तसेच रॅगिंग सहन करणे देखील चुकीचे आहे तेंव्हा ज्या विद्यार्थ्यावर रॅगिंग झाली आहे अशा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या अँटी-रॅगिंग समितीकडे तक्रार करावी असे आवाहन ॲड. निलम हजारे यांनी केले.

सदर कार्यशाळेसाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतम पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जे. एस. एम. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी केले. त्यांनी आपल्या प्रस्ताविकात अँटी-रॅगिंग कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला व विद्यार्थ्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाने अँटी-रॅगिंग संदर्भात दिलेला ऑनलाईन अंडरटेकिंग फॉर्म भरावा असे आवाहन प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी केले.

त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने पुरस्कृत केलेल्या अँटी-रॅगिंग संदर्भातील चित्रफितीं दाखवून विद्यार्थ्यांचे उद्बोधन करण्यात आले व प्रा. प्रमोद हिवरे व डॉ. संदीप घाडगे यांनी अँटी-रॅगिंग संदर्भातील फॉर्म भरण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. के.बी चौगुले यांनी केले तर प्रा. डॉ. बी. बी.भालेराव यांनी आभारप्रदर्शन केले.

या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. प्रविण गायकवाड, नॅक समन्वयक डॉ. अद्वैत घटपांडे, प्रा. निलम म्हात्रे प्रा. संदीप घाडगे तसेच दोन्ही महाविद्यालयांचे सहकारी प्राध्यापक, कर्मचारी आणि एकूण १९४ विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे