“आभारीय शब्दसुमने”; वर्षा मोटे
'मराठीचे शिलेदार समूह एक हक्काचे व्यासपीठ'
“आभारीय शब्दसुमने”; वर्षा मोटे
‘मराठीचे शिलेदार समूह एक हक्काचे व्यासपीठ’
क्षणिक मुळे भरावी भूमी
हलकेच मुळांचे हलते वारे
ही स्थलांतराची साद जरी
नवे आकाशही धरते श्वास सारे
सर्वप्रथम सर्व प्रशासकीय टिमच्या कार्याला माझे कोटी कोटी वंदन. आणि सर्व साहित्य प्रभूंच्या लेखणीस त्रिवार वंदन. तशी माझी समूहामध्ये हजेरी कधी कधीच असते. पण मी जेव्हा काहीतरी लिहिते, तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी मला खूप उत्सुकता असते ती म्हणजे राहुल सरांचा जादुई तीन अक्षरी संदेश. जो संदेश की तुम्हा सर्वांना परिचितच आहे. ‘तुमचा फोटो पाठवा’. हा संदेश नुसता वाचला तरी मनात उत्सुकता निर्माण होते की, आज आपण कोणत्या समूहात झळकणार. याची अस्वस्थता शांत बसू देत नाही. आज सकाळी माझेही असेच झाले मी जेव्हा राहुल सरांचा संदेश वाचला तुमचा फोटो पाठवा… मी कुठलाही विलंब न करता लगेच फोटो पाठवला.
आनंद उरी सांडला गंधून,
शब्दांत कसे करावे वर्णन
कृतज्ञतेने आले ह्रदय भरून
भावनांची करते मुक्त उधळण
आज समूहात सर्वोत्कृष्ट रचना सन्मानपत्राचे पोस्टर मी जेव्हा पाहिले तेव्हा माझा आनंद गगनात मावेना ह्या माझ्या गौरवामधे तुम्हा सर्वांचा अनमोल असा वाटा आहे. स्थलांतराच्या प्रवासात कधी नवी दिशा शोधली, कधी अनोख्या वाटांवर पाय ठेवला, तर कधी मुळांपासून दूर होण्याचा आर्त संघर्ष केला.
माझ्या कवितेतील त्या भावनांना मी शब्दरूप दिलं आणि ते परीक्षकांच्या हृदयाला भिडलं. यापेक्षा मोठं समाधान असू शकत नाही. तुमच्या प्रोत्साहनानेच मी आज येथे आहे. मी तुम्हा सर्वांचे हृदयापासून आभार व्यक्त करत आहे, कारण प्रत्येक प्रतिक्रिया आणि कौतुकाच्या शब्दाने मला आणखी उत्तम लिहिण्याची प्रेरणा दिली आहे.
आज माझ्या कवितेला आणि माझ्या शब्दांना जो सन्मान प्राप्त झाला आहे, ती माझ्यासाठी एक आयुष्याला मिळालेली प्रेरणा आहे, हे मी मनापासून मानते स्थलांतराच्या विषयावर लिहिताना मी अनुभवलेल्या भावनांना शब्दरूप देताना एका वेगळ्या प्रवासाला सुरुवात केली होती. या प्रवासात कधी मुळांचा ओलावा जाणवला, तर कधी अनोळखी मातीचे आव्हान स्वीकारावे लागले. कधी आपल्या ओळखीच्या वाटा हरवल्यासारख्या वाटल्या, तर कधी नवीन वाटांनी उमेद दिली. माझ्या प्रत्येक शब्दाला तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनातून मला पुढे लिहिण्याचा अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त करण्याचा आत्मविश्वास मिळाला.
आजचा हा सन्मान केवळ माझा नाही; तो आपल्या सर्वांचा आहे. तुमच्याविना हा प्रवास कधीच शक्य झाला नसता. तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचे ऋण शब्दांमध्ये व्यक्त करता येणं अवघड आहे, पण तरीही, माझ्या हृदयातील आभारी भाव तुमच्यापर्यंत पोहोचावा, हीच प्रार्थना आहे. या ऋणानुबंधाचे बंध सदैव जपण्याचा प्रयत्न मी करत राहीन. धन्यवाद!”
पुन्हा एकदा सर्वांचे आभार. मराठीचे शिलेदार समूहाचे आधारस्तंभ आदरणीय. राहुल दादा.. आ. पल्लवी ताई.. आ. सविता ताई आ. वैशालीताई आ. स्वातीताई आ. वृंदाताई, आ. तारकाताई, आ. सुधाताई, आ. शर्मिलाताई,आ. अरविंद दादा, आ. विष्णू दादा, आ. संग्राम दादा, आ. हंसराज दादा, आ. अशोक लांडगे दादा, त्याचबरोबर शुभेच्छा व आशीर्वाद देणारे माझे सर्व शिलेदार बंधू-भगिनी आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार.
कवयित्री वर्षा मोटे पंडित
छत्रपती संभाजी नगर
©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह



