0
4
8
2
9
4
आनंद तो सुगंधापरी
क्षणोक्षणी घ्यावा पुरेसा
आनंद तो सुगंधापरी
द्यावे निखळ हर्ष क्षण
सुख पसरावे चराचरी
अंतरीचे दु:ख विसरून
क्षण क्षण सुखाचे वाटावे
दुजाला हसवता हसवता
आपणही हास्य गीत गावे
आनंद तो सुगंधापरी
जाणावे त्याचे सार्थ मूल्य
क्षण सौख्याचे जगताना
विसरून जावे वैफल्य
परिमळ पसरावा चौफेर
ऐसे वर्तन हवे सनदशीर
आनंद तो सुगंधापरी देई
मानवा संकटातही धीर
दत्ता काजळे,’ज्ञानाग्रज’
तुरोरी जि.धाराशिव
=========
0
4
8
2
9
4



