कवितानागपूरबीडमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
स्वप्न शर्मिला देशमुख-घुमरे बीड
0
4
8
2
9
3
स्वप्न
किती स्वप्ने रोजची
नानापरी ती रंगवली
वास्तवाच्या उंबरठ्यावर
कशी धुक्यात विरली
कधी सोसत झळा
उन्हात तप्त तापलेल्या
शीतलहरींच्या कडा
ध्रुवात जशा गोठलेल्या
स्वप्नांचेही तसेच जणू
कडा सदा पाणावलेल्या
पंख लावून कल्पनेचे
अधांतरी लटकलेल्या
सत्य ते भयानक
नजरेसमोर उभे कसे
मखमली स्वप्नांची
तह्यात राखरांगोळी होतसे
नसावाच अधिकार
सुखस्वप्ने रेखाटण्याची
कशाला ती आशा
स्वप्ने मजेत रंगवण्याची
शर्मिला देशमुख -घुमरे
केज रोड,जि.बीड
0
4
8
2
9
3



