ॲड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयामध्ये “सुधारित फौजदारी कायदे” विषयावर सेमिनार
ॲड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयामध्ये “सुधारित फौजदारी कायदे” विषयावर सेमिनार
अलिबाग: ॲड. दत्ता पाटील विधी महाविद्यालय आणि पोलीस अधिक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “सुधारीत फौजदारी कायदे” या विषयावरील सेमिनारचे शनिवार, दि.२९ जून २०२४ रोजी आयोजन करण्यात आले होते.या सेमिनारमध्ये १ जुलै २०२४ पासून नविन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतम पाटील यांनी IPC,CRPC आणि IEA या संहितांची बदललेली शीर्षर्के अनुक्रमे भारतीय न्याय संहिता २०२३(BNS),भारतीय नागरीक सुरक्षा संहिता२०२३ (BNSS)आणि भारतीय साक्ष अधिनियम २०२३ (BSA) या संदर्भात विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करावा या संदर्भात मार्गदर्शन केले.
सेमिनारमधील प्रमुख व्याख्याते मा.डॅा.अविनाश अशोक नाईक (अतिरिक्त सरकारी वकील,सहाय्यक सरकारी वकील,(अपिलेट साईड) बॅाम्बे हायकोर्ट) यांनी मार्गदर्शन करताना IPC आणि CRPC हे ब्रिटिशकालिन कायदे भारतीयांना गुन्हेगार ठरवणे आणि दंड किंवा शिक्षा ठरवणे या संर्दभात होते आता भारतीय न्याय संहिता २०२३आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ ही भारतीय शीर्षके कशी योग्य आहेत याबाबत सविस्तर माहिती दिले.
पोलिसांनी आपल्या जबाबदार-या पार पाडताना म्हणजेच हातकडी घालणे, FIR,ZERO FIR,Audio-Video Electronic Means चा वापर, Electronic copy तयार करणे, पंचनामा करताना Forensic Team सोबत नेणे,पुरुषांप्रमाणेच स्त्रियांवरही summons बजाविणे,Daily Diary संकलित करणे यासंदर्भात नव्याने ज्या तरतूदी करण्यात आल्या आहेत याबाबत सविस्तर माहिती दिली.
आता बलात्काराच्या केसमध्ये महिला मॅजिस्ट्रेट असणे बंधनकारक केले आहे हा महत्वाचा बदल विशद केला.त्याचबरोबर जे sections भारतीय न्याय संहितेमधून रद्दबातल केले आहेत उदा.section 124(A),153(A), 377, 498(A)
याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर जे नविन sections संकलित करण्यात आले आहेत उदा.section 69,73,95,264 याबाबत उदाहरणासहित मार्गदर्शन केले.मा.ॲड.विशाल भोईर (सिनियर ॲडव्होकेट,ठाणे) यांनी भारतीय साक्ष अधिनियम २०२३ मध्ये झालेले बदल उदा.दस्तऐवज कश्याला म्हणावे,पुरावे,प्राथमिक आणि दुय्यम पुरावा,इलेक्ट्रॅानिक पुरावा आणि त्यांचे पुरावा म्हणून सादरीकरण कसे करावे इ.बाबत सविस्तर माहिती दिली. विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य ॲड.नीलम हजारे यांनी प्रास्ताविक सादर केले.
सेमिनारमध्ये रायगड जिल्ह्यातील सुमारे १०० पोलिस कर्मचारी,विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.ॲड. गौतम पाटील, उपाध्यक्षा डॅा.साक्षी पाटील,पोलीस अधिक्षक जिल्हा रायगड,मा.श्री.सोमनाथ घार्गे,महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य ॲड.नीलम हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.पियुषा पाटील, प्रा.चिन्मय राणे विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वीरित्या सेमिनारचे आयोजन केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नीलम म्हात्रे यांनी केले तर श्री.युवराज म्हसकर (सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशिक्षण शाखा)यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.



