Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखमराठवाडाविदर्भसाहित्यगंध

‘पणतू’ मधुचंद्रासाठी अजिंठ्यात..,!!

कुसुमलता दिलीप वाकडे, उमरेड रोड, दिघोरी नागपूर

0 5 1 7 8 1

‘पणतू’ मधुचंद्रासाठी अजिंठ्यात..,!!

छत्रपती संभाजीनगर (जुने नाव औरंगाबाद) शहरापासून सुमारे १०२ कि.मी.अंतरावर, रमणीय सृष्टीसौंदर्याने नटलेल्या एका प्रचंड नालाकार घळीमध्ये खडकात कोरलेली ‘अजिंठा लेणी’ वसलेली आहे. डाॅ.रॉबर्ट गिल हे एक ब्रिटिश चित्रकार व अधिकारी होते. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात ते भारतात आले, तेव्हा त्यांना अजिंठा लेणीच्या भित्तीचित्रांना पाहण्याची संधी मिळाली. गिल यांनी येथील भित्तीचित्रे कॅनव्हास वर उतरवली. त्याच्यामुळे लेण्यातील पेंटिंगचा जागतिक स्तरावर प्रसार झाला. १८४५ मध्ये लेण्यात उत्खननाचे काम सुरू होते. हजारो मजूर या कामात गुंतले होते. यातच एक म्हणजे लेणापूर गावची आदिवासी कन्या पारो येथील खडान् खडा माहिती असलेली पारो गिल यांना मदत करायची त्यातच त्याचे प्रेम जुळले. गावातच पारोची समाधी आहे. राॅबर्ट गिल-पारो प्रेम कहाणी येथे प्रसिद्ध आहे.

आता मागे सप्टेंबर २०२५ ला जगप्रसिद्ध अजिंठा लेणीचे पेंटिंग जगभरात पोहोचविणारे राॅबर्ट गिल यांचे पणतू ‘केनेथ डुकाटेल’ यांनी मधुचंद्रासाठी अजिंठा लेणी व छत्रपती संभाजीनगरची निवड केली. येथे दाखल झाल्यानंतर त्यांनी पत्नी कॅथरीना सुयकेन्स यांच्यासह अजिंठा लेणीला भेट दिली होती. लेणीतील पेंटिंग पाहून तेही थक्क झाले. ते म्हणालेत “आज येथे येणे सोपे आहे; पण त्या काळी आमचे पणजोबा येथे कसे आले असतील, कसे येथे राहिले असतील, याचे आश्चर्य वाटते.” डुकाटेल यांनी हे कुतूहल व्यक्त करतांना भित्तीचित्रे, मूर्तीकाम यांचे कौतुकही केलेत.

अजिंठा लेणीचे संरक्षण सहाय्यक मनोज पवार यांच्याशी बोलताना केनेथ डुकाटेल म्हणालेत “जगाच्या या अदभुत गोष्टीचे जतन करण्याची तुमची मोठी जबाबदारी आहे”, पण ही जबाबदारी तुम्ही कौशल्याने पार पाडत आहात माझे महान पणजोबा मेजर डाॅ.गिल यांच्याप्रती तुमच्या आदराने मी खूप आनंदी झालो आहे. हा एक असा खजिना आहे, जो आपण आयुष्यभर जपून ठेवला पाहिजे.

कुसुमलता दिलीप वाकडे,
उमरेड रोड, दिघोरी नागपूर
(लेखिका सेवानिवृत्त पदवीधर शिक्षिका आहेत)
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 8 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे