0
4
8
2
9
7
माझी सुरू झाली शाळा
ये आई,आज माझी
सुरु झाली शाळा,
आनंद माझा गेला गेला
उंच उंच आभाळा….
चल आता लवकर
मला तयारी करू दे,
पाटी,पुस्तक,वही माझ्या
दप्तरी भरू दे….
जिल्हा परिषद शाळा माझी
आहे लई भारी,
या शाळेत शिकण्याची गं
गंमतच लई न्यारी…
आज होणार प्रवेशोत्सव
शाळेत साजरा,
बालचमूंचा दिसणार
सगळ्या चेहरा हसरा…
दिवस आजचा माझा
शाळेचा पहिला जरी आहे,
शाळेची ओढ राहणार
ही गोष्ट खरी आहे….
आदरणीय गुरूजन माझे
वंदन त्यांच्या चरणी,
तेच करणार उज्ज्वल
आयुष्याची पायाभरणी…
शिकणार मी खूप आई
मागे राहणार नाही,
प्रगतीची वाटचाल माझी
तू डोळे भरून पाही…
नवनवीन कलागुणांना
वाव इथे मिळणार,
संस्कारक्षम आयुष्य अवघे
या शाळेतच घडणार….
ही आवडते मज मनापासून
जिल्हा परिषद शाळा,
आई तुझ्यासारखाच ती
लावेल मला मायेचा लळा…
पांडुरंग एकनाथ घोलप
ता.कर्जत जि.रायगड
0
4
8
2
9
7



