आफ्रिका खंडाचे दोन तुकडे होणार
जगाला आणखी एक महासागर मिळणार?
आफ्रिका खंडाचे दोन तुकडे होणार
जगाला आणखी एक महासागर मिळणार?
पृथ्वीवर सध्या पाच महासागर आहेत, पण भविष्यात सहावा महासागर तयार होऊ शकतो अशी शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. शास्त्रज्ञांना आफ्रिकेत एक मोठी दरड सापडली आहे. ज्यामुळे हा दावा केला जात आहे. यामुळे काय काय परिणाम होऊ शकतात याबाबत ही खुलासा करण्यात आला आहे.
पृथ्वीचा ७१ टक्के भाग हा पाण्याने व्यापला आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. त्यातील बहुतेक पाणी हे पृथ्वीवरील पाच महासागरांमध्ये विभागलेले आहे. ज्यामध्ये पॅसिफिक, अटलांटिक, भारतीय, दक्षिण आणि आर्क्टिक महासागर यांचा समावेश आहे. पण आता शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, लवकरच जगात सहावा महासागर निर्माण होऊ शकतो. शास्त्रज्ञांना पूर्व आफ्रिकेत एक मोठी दरड सापडली आहे. शास्त्रज्ञांना दावा आहे की, येथे हळूहळू महासागर निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे आफ्रिका खंडाचे दोन भाग होऊ शकतात.
पूर्वेला सोमाली प्लेट आहे आणि पश्चिमेला न्युबियन प्लेट आहे. जिथे या प्लेट्स जटिल टेक्टोनिक पद्धतीने एकत्र येतात. या प्लेट्सचे विभाजन होऊन आफ्रिकन खंडाचे दोन स्वतंत्र भाग होऊ शकतात. पूर्वेकडील भाग भविष्यात एक लघु-खंड बनण्याची शक्यता आहे. जसजसे प्लेट्स हळूहळू वेगळे होत जातील तसे तेथे पृथ्वीच्या आवरणातून मॅग्मा रिकाम्या जागा भरण्यासाठी उगवतो आणि नवीन महासागराचा कवच तयार करतो. ही एक चालणारी प्रक्रिया आहे. लाखो वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका अशाच प्रकारे विभक्त झाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
जर असे झाले तर पृथ्वीवर मोठा भौगोलिक बदल दिसू शकतो. आफ्रिका खंडाचे विभाजन होत राहिल्याने, पूर्वेकडील भाग काही काळाने वेगळा होऊन एक छोटा खंड बनू शकतो. या प्रक्रियेमुळे एक नवीन किनारपट्टी तयार होऊ शकते. जसजसे ही फट रुंद होत जाईल तसतसे त्याल लाल समुद्र आणि एडनच्या आखातातून पाणी भरायला सुरुवात होईल. ज्यामुळे एक नवीन सागरी मार्ग ही तयार होऊ शकतो. तसेच जैवविविधतेचा उदय होऊ शकतो. पण यामुळे प्रभावित देशांसाठी आर्थिक संधी, जसे की मासेमारीसाठी मैदान आणि सागरी व्यापार मार्ग देखील मिळू शकतो. पण यामुळे काही आव्हानं देखील येऊ शकतात. जशी की, शेती, पायाभूत सुविधा आणि मानवी वसाहती यांच्यावर परिणाम होऊ शकतो.
पण ही लाखो वर्षांपासून सुरू असलेली संथ प्रक्रिया आहे. पण अलीकडच्या काळात त्याला वेग आल्याचं दिसतंय. 2020 मध्ये, शास्त्रज्ञांनी असे भाकीत केले होते. पण 2024 मध्ये आग्नेय आफ्रिकेत एक महाकाय असी फट सापडल्याने त्याला आणखी गती मिळाल्याचं शास्त्रज्ञांचं लक्षात आलंय.