“आभाराची शब्दफुले”; वनिता गभने
मराठीचे शिलेदार समूहाप्रती शब्दसुमने
“आभाराची शब्दफुले”; वनिता गभने
मराठीचे शिलेदार समूहाप्रती शब्दसुमने
मम अस्तित्वातवाची ओळख
इथेच झाली मला नव्याने …
कसे मांडावे शब्द ऋणात
शब्दच वाटतात आज उणे…
लाल तांबड्या आभाळावर दस्तक देता रवी…
मोबाईलमध्ये डोकावते माझ्यातील मन कवी… कशासाठी..??? अहो.. सर्वांना हवाहवासा सरांचा तीन शब्दांचा जादुई मेसेज, “तुमचा फोटो पाठवा “, आज मला तर नाही ना, म्हणून. आज सकाळीच या मेसेजवर माझे नयनबाण पडले आणि अवतीभवती हर्षवलय निर्माण झाले.मनात आनंदाची किलबिल झाली, व घरकामाला, ” थोडे तुझं थोडं माझं” म्हणत पोस्टर नेमके कशाचे?? या अधिरतेने मी मोबाईलमध्ये डोकावू लागले. थोड्याच वेळात मोठी कविता ( किशोर) पोस्टरवर झळकली, आणि मी क्षणात सातवा आसमान फिरून आले..!!
काल समूहात, ‘नयनबाण’ विषय पोस्ट होताच, मन भूतकाळात गेले…’अकरावीची ती वर्गखोली , बेंचवर बसलेल्या आम्ही दोघी, व आमच्या बेंचवर सतत त्याचे रोखलेले नयनबाण’.. ते नेमके कुणासाठी? , हे खूप दिवस कळलेच नाही.. आणि जोवर कळले नाही तोवर आम्हीही चालत राहलो बेफिकीरपणे नाकासमोर अगदी सरळ .
हाच भूतकाळ रचनेत मांडण्याचा मी प्रयत्न केले लिंगबदल करून, फरक एवढाच की, मुलगा चकना बिकना नव्हताच मुळी.. खरे बघता, ‘ रूप निसर्गाचे देणं..का शोधावे आम्ही त्यात उणं, जो रूपावरून दुसऱ्यांना समजतो हीन, त्यांची मानसिकता असते दीन…’ असे माझे तरी मत आहे. खरे तर मला कविता उपहासात्मक लिहायची नव्हतीच पण एका खट्याळ मनातून ती सहजतेने व्यंगात्मक कशी काय साकारली कळलेच नाही…. नेमकी हीच खट्याळ कविता परीक्षकांना भावली हेही नसे थोडके…
आज माझ्या रचनेला सर्वोत्कृष्ट च्या पोस्टरवर सन्मानित करून गौरविण्यात आल्याबद्दल समूहाचे आधारवड आदरणीय राहुल सर, आदरणीय पल्लवी ताईसो, आदरणीय सविता ताईसो, आ. वैशाली ताईसो, आदरणीय स्वाती ताईसो, आदरणीय वृंदा ताईसो, आदरणीय सुधा ताईसो, आदरणीय तारका ताईसो, आदरणीय शर्मिला ताईसो , आदरणीय कुमठेकर सर, आदरणीय लांडगे सर, आदरणीय खोब्रागडे सर, आदरणीय विष्णू दादा, सर्व प्रशासक सहप्रशासक, परिक्षकांचे आभार मानते. समूहातील सर्व ताई दादा जे नेहमीच प्रोत्साहन देऊन माझ्या लेखणीला बळ देतात, त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे.
सौ वनिता गभणे
आसगाव भंडारा
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह