“शब्दपुष्प आभाराची”; प्रतिमा नंदेश्वर
“शब्दपुष्प आभाराची”; प्रतिमा नंदेश्वर
सर्वोत्कृष्ट सन्मान एक सुखद धक्का
काल राहुल सरांनी ‘नयनबाण’हा विषय समूहात रचनेसाठी दिला होता. चारोळी समूह ४ मध्ये मी रचना लिहिली बाकी कुठल्याही समूहात माझी रचना नव्हती.. तुमचा फोटो पाठवा हा सुखावणारा राहुल सरांचा मॅसेज आज सकाळी मी उशीरानेच बघितला..आणि वाटले नयनबाण हिच रचना आली असावी म्हणून आधीच मन हर्षून गेले..मी फोटो पाठवायला जरा उशीरच केले तोपर्यंत माझ्या छायाचित्रातील रचना आकर्षक पोस्टरमध्ये समूहात झळकली होती.बघून मला खूप खूप आनंद झाला.. माझ्यासाठी हा सन्मान खुपच मोलाचा आहे.सकाळी सकाळी शाळा,कामाची घाई असल्याने मोबाईल बघायला वेळच नसतो. त्यामुळेही सरांचा मॅसेज बघता येत नाही. वारंवार क्षमा मागतांना मलाच आता वाईट वाटते आहे. आपल्या लाडक्या कुटुंबप्रमुखाच मन सागराएवढ मोठ असल्याने ते माफ करतीलच अशी आशा करते.. अनेक पुरस्कार प्राप्त कवयित्री हा माझा सन्मान व ओळख हि शिलेदार समूहाचीच देण आहे. शिलेदार समूहाच्या मी सदैव ऋणाईत..!!
मुख्य परीक्षकांनी माझ्या ‘नयनबाण’ या विषयावरील रचनेची सर्वोत्कृष्ट म्हणून निवड केली. व मला सन्मानित केले त्याबद्दल मराठीचे शिलेदार समूहाचे आधारवड,कल्पवृक्ष, देवांश, कवी, आदर्श शिक्षक, मुख्य संपादक, आयोजक, प्रशासक आ राहुल सर मुख्य सचिव निवासी संपादक आ. पल्लवीताई कार्यकारी संपादक,प्रशासक मुख्य परीक्षक आ. सविताताई, मुख्य सहसंपादक आ. वैशालीताई, आ. वृंदाताई, सहसंपादक आ. तारकाताई,आ स्वातीताई, आ. सुधाताई, आ. शर्मिलाताई, आ. विष्णू दादा, संग्राम दादा, उरकुडे सर, लाडगे दादा, हंसराज दादा, बन्सोड दादा सर्व प्रशासकीय टिमचे हृदयस्थ आभार. माझ्यावर शब्दसुमनाने अभिनंदनाचा वर्षाव करणारे समूहातील प्रिय दादा, ताईंचे मनपूर्वक धन्यवाद..!
कवयित्री सौ. प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह