0
4
8
2
9
4
माणुसकीचे रोपटे
माणुसकीचे रोपट मनी
लावूणीया हृदयाच्या अंगणी
मिळेल नात्याचा ओलावा
काळजाच्या शेतात लावूणी
रोप वाढताना घेऊ काळजी
नाजूक मनाला आनंदाच खतपाणी
गैर शब्द नको आपल्या कानी
तोंडी असावी शुद्ध वाणी
तना मनात वाढलेली विकृती
स्पर्श करू नका हृदयाशी
विकृतीच बांडगूळ वाढत जाईल
माणुसकीचं नातंजोडा मनामनाशी
नातीगोती मैत्री जपुया चला
प्रत्येकाचा करूनीया आदर
माणसांशी माणसासारखे वागू
निसर्ग करेल तुमची कदर
राग, वैर, द्वेश भावना सोडून
आपुलकीने तडजोड सोडवावी
गरीब दुर्बल गरजू लोकांना
आपलेपणाची माणुसकी दाखवावी
कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
0
4
8
2
9
4



